गोंदिया : गोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्रामपंचायतीचे सचिव व सरपंच गावातील गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील एक ४५ वर्षीय इसम पाण्याच्या टाकीवर चढला. तब्बल सहा तासानंतर त्याची समजूत काढल्याने व त्याच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याने तो टाकीवरून खाली उतरला. अर्जुनी येथील नरेंद्र गजभिये यांनी बुधवार ११ ऑक्टोबरला पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गावडे यांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माहिती मिळाल्यानंतर रावणवाडीचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहिरकर आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. गजभिये यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून समजूत काढल्यानंतर बुधवारी दुपारी २ वाजता ते टाकीवरून खाली उतरले. गजभिये यांनी ग्रामसेवक एल. पी. डोंगरे याच्या निलंबनाची मागणीही केली. शाळेतील निवडणूक जी. आर. नुसारच घेण्यात आली. नरेंद्र गजभिये यांना काही गैरसमज झाला आहे, असे मत जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका एम.बी.रंगारी यांनी व्यक्त केले.