गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयाचे विज्ञान विषयाचे शिक्षक लोकेश चौरवार यांची मे महिन्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही मालिकेसाठी निवड झाली होती. त्यांना नुकतेच चित्रीकरणासाठी मुंबईला बोलावण्यात आले होते. या खेळादरम्यान अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अचूक उत्तरे देत ६ लाख ४० हजार रुपये जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या…

ही मालिका सोनी वाहिनीवर पुढील १२ आणि १३ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १०:३० या वेळेत प्रसारित होणार आहे. चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांनी दिवं. मनोहरभाई पटेल यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त चांदपूर येथील प्रसिद्ध जागृत हनुमान देवस्थानला भेट दिल्याच्या आठवणी सांगितल्या. तिरोडा येथे शहीद मिश्रा विद्यालय, शहरातील इतर सामाजिक संस्था व प्रतिष्ठित नागरिकांतर्फे चौरवार यांचा सत्कार करण्यात येत आहे.