गोंदिया: कोहका-भानपूर जंगलात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आले होते. ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक,अधिकारी , कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृत वाघ हा टी -१४ चा बछडा असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी दिवसभर कोहका-भानपूर जंगलातून त्या मृत वाघाला गोंदियातील कुडवा वन परिक्षेत्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आता स्पष्ट झालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार सदर वाघाचे यकृत रक्तसंचयित, प्लीहा रक्तसंचयित, पृष्ठभागावर गाठी आढळल्या, त्याची फुफ्फुसे निकामी झाली होती. खूप रक्तसंचयित झाले होते, हृदय – पेरिकार्डियममध्ये द्रव साचलेले होते, तसेच रक्त गोठल्याने गंभीर संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाला. ही माहिती गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी दिली.

हेही वाचा : बुलढाणा : वारी हनुमान संस्थानवर दरोडा, पुजाऱ्याला बांधून लाखोंचा ऐवज लंपास…

ग्रामस्थ आणि वनविभागात जुंपली

भानपुर – कोहका वन परिसरातील जंगलात टी-१४ च्या या बछड्याचे येणे जाणे हे मागील एक दोन महिन्यापासून सुरू होते. पण नुकतेच ८ ते ९ जानेवारीदरम्यान गावातील काही ग्रामस्थांनी हा वाघ गावाजवळील जंगलात वावरात असल्याची चित्रफीत गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित झाली होती. त्यात या वाघाला लांबून मोबाईलच्या कॅमेरात टिपण्यात आले होते आणि याबाबतची माहिती या क्षेत्रातील वनपालाला पण सांगितली होती. वनपालांनी त्यावेळी ग्रामस्थांना गावाजवळील जंगलात वाघ असेल तर जंगलात एकटे जाणे टाळावे असे सांगितले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर वाघ हा आजारी होता, पण हे माहिती असून सुद्धा वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या वाघाच्या आजारात वाढ होऊन मृत्यू झाला. सेजगावचे सरपंच प्रमोद पटले यांनीही हाच आरोप केला आहे. तसेच यापूर्वीही या परिसरातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जवळील जंगलातील प्राणी दगावलेले आहेत. गावातील वन हक्क समिती, वनव्यवस्थापन समिती सोबत वनविभागाचे कर्मचारी सामंजस्य निर्माण करून ठेवीत नसल्यामुळे अशा प्रकारे मोठ्या घटनेला सामोरे जावे लागत असून भानपूर कोहका जंगल परिसरातील जंगलातील वन्य प्राण्यांचा जीव जात आहे, आरोपही भानपूर कोहका, सेजगावच्या ग्रामस्थांनी वन विभागावर केला आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…

ग्रामस्थांचे आरोप चुकीचे – वनपरिक्षेत्राधिकारी

भानपूर- कोहका जंगल परिसरात टी-१४ वाघाचा बछडा हा नव्याने दाखल झालेला वाघ होता. या परिसरात एनटी -३ ही वाघीण आणि इतर वाघ आहेतच. त्याच परिसरात नव्याने आलेला हा टी-१४ चा बछडा वावरत असल्याची माहिती वन विभागाला होती, पण तो आजारी आहे हे ग्रामस्थांना कसे कळले हाच प्रश्न आहे. कारण ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तो एकाच जागी बसून होता त्यामुळे त्याला आजारी समजणे हे चुकीचे आहे. बहुतांशप्रसंगी एखादी शिकार करून ठेवल्यानंतर पण वाघ एकाच जागी बसून असतो त्यामुळे वाघांच्या हालचालीवर वन विभागाला कळते. त्यामुळे सदर वाघ हा आजारी असून वन विभागाने त्यावर लक्ष दिले नाही हे ग्रामस्थांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. भानपूर कोहका शेजगावच्या ग्रामस्थांनी वन विभागावर चुकीचे आरोप करीत अशाप्रकारे बोलू नये अन्यथा वन विभागाकडून त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी दिला आहे.