गोंदिया: गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वैभव वाढावे व पर्यटक येथे येण्याकरीता आकर्षित व्हावे या उद्देशाने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातून तीन वाघ सोडण्यात आल्याने या वर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे येणाऱ्या पर्यटकांना पूर्वी कधी एखाद्या वाघाचे दर्शन व्हायचे पण हल्ली प्रत्येक एक दोन दिवसांनी येथे वाघांचे दर्शन मागील एप्रिल, मे आणि जून महिन्यात व्हायचे, एकंदरीत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे वन वैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २० मे २०२३ ला वनमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्या हस्ते दोन वाघ सोडण्यात आले होते, त्यापैकी एक वाघीण हि सोडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शेजारील मध्यप्रदेशात निघून गेल्याने पुन्हा ११ एप्रिल २०२४ ला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एक वाघीण सोडण्यात आली.

हेही वाचा : यवतमाळ: नेरच्या महिलेचा तिरुपती येथे अपघाती मृत्यू

तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी-३ या वाघिणीला बछडे झाल्याने येथील वाघांची संख्या वाढली त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करिता आलेल्या पर्यटकांना, लोकांना वाघांचे सहज दर्शन होत असल्याने व त्यांनी काढलेली चित्रफित वा छायाचित्र मित्र मंडळी तसेच समाज माध्यमातून या दोन्ही जिल्हासह इतरत्र ही प्रसारित करण्यात आल्याने तसेच प्रसार माध्यमातून ही या बाबत प्रसारित केल्या गेल्या असल्याने या वर्षी पर्यटकांची संख्या लक्षणीय रित्या वाढली तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात.

हेही वाचा : यवतमाळ : राळेगावात सराफा दुकान फोडले, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मागील वर्षी या हंगामात १५ हजार पर्यटकांनी या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिराला हजेरी लावली होती तर दुसरीकडे या वर्षी पर्यटकांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी ३१ जून पर्यंत १७ हजार ३३२ पर्यटक या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पा जंगल सफारी करिता आले आहेत. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्याघ्र प्रकल्पाच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३१ लाख ६० हजार रुपये महसूल गोळा झाला होता तर यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने ४२ लाख १७ हजार रुपये एवढा महसूल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून मिळाला आहे तर या वर्षी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली हे विशेष. सोमवार १ जुलै २०२४ पासून येथे पर्यटकांकरिता जंगल सफारी बंद करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia tourist attracts towards navegaon nagzira tiger reserve for tourism of tigers sar 75 css
Show comments