गोंदिया : येथील भाजी बाजारात काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर १३० ते १५० च्या घरात असताना दोन टोमॅटो चोरीच्या घटना घडल्या होत्या. बुधवारी गोंदिया भाजी बाजारात २०० रुपये प्रतिकिलो असा दर होता. नुकतेच चार ते पाच महिन्यांपूर्वी भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, तोच टोमॅटो आता अपेक्षेपेक्षाही अधिक ‘भाव’ खात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी २० ते ३० रुपये प्रतिकिलो मिळणारा टोमॅटो आता २०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांना आता बराच विचार करावा लागत आहे. अन्य भाजीपाल्यांचेही दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटो हा विशेषतः रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक आहे. मात्र, २०० रुपयांत पूर्ण बाजार होण्याऐवजी आता केवळ टोमॅटोच २०० रुपये दराने घ्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदीबाबत संभ्रमात पडले आहेत.

हेही वाचा – नागपूर :लोकवस्तीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप, लोकांची उडाली तारांबळ; ‘अलबिनो चेकर्ड किल ब्याक’ची सर्वत्र चर्चा

पावसाळ्यात शेतीच्या हंगामाला सुरुवात होते. या काळात भाजीपाल्याच्या काळात भाजीपाल्याचे पीक घेण्याऐवजी हंगामी पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक अत्यंत कमी होऊन भाजीपाल्याच्या किमतीत वाढ होते. टोमॅटोचा वापर घरगुती खाद्यपदार्थांबरोबर हॉटेल, रेस्टारंटमध्ये अधिक होतो. अनेक डिशेसमध्ये टोमॅटोचा वापर होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गोंदिया शहरात टोमॅटोची आवक कमी
झाली आहे. त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरवाढीवर झाला आहे. टोमॅटोबरोबरच इतरही भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, गोंदिया शहरातील दैनंदिन भाजी बाजारात टोमॅटोचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांवर पोहोचले आहेत. भाव वाढल्याने टोमॅटो घेणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली आहे. भाज्यांचे भाव पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कडाडल्याने ग्राहकांच्या खिशावर अधिकचा बोजा वाढला आहे. आता भाजीपाल्यानेही घाम फोडला.

हेही वाचा – चिखल महोत्सव: ‘बालपण भारी देवा’ म्हणत आदर्श इंग्लिश शाळेची मुलं रंगली चिखलात

३२०० रुपयांना एक कॅरेट

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. अशा स्थितीत शेजारील राजनांदगाव (छत्तीसगढ) या बाहेर जिल्ह्यातून येणारा टोमॅटो ३ हजार २०० रुपये प्रति कॅरेट दराने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे आपले परिश्रम काढून विक्रेते २०० रुपये प्रति किलोने टोमॅटो विक्री करीत आहेत. टोमॅटोची निर्यात वाढून भाव कमी झाल्यास टोमॅटो कमी दराने विक्री करता येईल, असे भाजीपाला विक्रेते कैलाश नागरिकर यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia vegetable market tomatoes price are rs 200 per kg sar 75 ssb