गोंदिया : तरुणाचा मित्राच्या बहिणीवर जीव जडला. त्यांच्यात मोबाईलवर बोलणे सुरू झाले. भावाला याबाबत कळले. त्याने मित्राला समजावले. मात्र, त्यानंतरही मित्र आणि बहिणीचे भेटणे, बोलणे सुरूच होते. भावाने आपल्या मित्राला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने भावाने मित्राचा खून केला. ही घटना शहरातील डॉ. आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड, कुडवा येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. एका प्रेम प्रकरणाच्या या रक्तरंजित अंताची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “पूर्वजांचा अशांत आत्मा भटकत असून…”, भूतबाधेची भीती दाखवून महिलेला लुटले; दोघांना अटक

प्रज्वल अनिल मेश्राम (२०, रा. कुडवा) असे मृताचे नाव आहे. रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल आणि दोन आरोपी हे तिघेही एकमेकांचे मित्र असून यातील मृताचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. यातून प्रज्वल आणि आरोपीचा यापूर्वीही वाद झाला होता. पण त्यानंतरही प्रज्वल आणि आरोपीची बहिण यांच्यात भेटीगाठी आणि मोबाईलवर बोलणे सुरूच होते. आरोपीने प्रज्वलला परत एकदा समजविण्याच्या उद्देशाने त्याच्या कुडवा येथील घरातून बाहेर बोलावले. दोघांत वाद आणि झटापट झाली. यानंतर आरोपीने प्रज्वलला चाकूने भोसकले. यात प्रज्वलचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संकेत बोरकर (२०) व आदर्श भगत (२०) या दोघांना ताब्यात घेतले.