गोंदिया : गोंदिया शहरातील कुडवा परिसरात ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दरम्यान एका युवकाची उसनवारी पैशाच्या वादातून हत्या करण्यात आली. मनीष भालाधरे रा.कुडवा असे मृतकाचे नाव आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा कुडवा येथील रहिवासी असून त्याचे नाव मनीष भालाधरे आहे. सदर घटना गोंदिया ते धापेवाडा मार्ग परिसरातील आहे. मृतक व आरोपी यांच्यामध्ये उधारीच्या पैशावरून वाद असल्यामुळे या पूर्वी ही अनेकदा वाद विवाद होत होते. मात्र आज मध्यरात्री झालेला वाद इतका विकोपाला गेला की त्या वादाचा अंत हत्येमध्ये झाला.
मध्यरात्री मृतक व आरोपी यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन त्याला हत्येचे स्वरूप आले. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. याच कुडवा परिसरात दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या अशा घटनांनी कुडवा परिसरातील सामान्य जनमानसाच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा : चोरट्यांनी चक्क ‘एटीएम’च नेले उचलून, लाखोंची रक्कम लंपास; संग्रामपूर येथील घटना
७ जानेवारीला मध्यरात्रीचा सुमारास झालेल्या या खून पूर्ववैमनस्यातून झालेला आहे. पोलीस तपासात या प्रकरणात एकूण पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी एक आरोपी संतोष मानकर याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि ते पण लवकरच अटक होणार असल्याची माहिती रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू बस्तावडे यांनी लोकसत्तासोबत बोलताना सांगितले.