गोंदिया : दुचाकीला धडक देण्यावरून झालेल्या वादाची परिणीती रात्री उशिरा तिघांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गोंदियातील दिवाळीच्या दिवशी गजबजलेल्या रेलटोली परिसरातील गुजराती शाळेसमोरील चौपाटी जवळ घडली. अर्पित उर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३) रा. आंबाटोली, गोंदिया असे या घटनेतील मृतक तरुणाचे नाव आहे. खूनाचा गुन्हा केल्यानंतर तिघे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत . रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या तरुणाच्या मारेकरीचा शोध सुरू केला आहे.

दिवाळीच्या रात्री उशिरा शहरातील रेलटोली परिसरात खळबळजनक घटना घडल्याने खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. रामनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री ११:१५ ते ११:३० च्या सुमारास रेलटोली परिसरातील गुजराती शाळेसमोरील चौपाटी जवळ घडली.

हेही वाचा : परदेशी शिष्यवृत्तीकडे मराठा विद्यार्थ्यांची पाठ, ओबीसी प्रवर्गात केवळ ५० उमेदवारांनाच संधी

मृतक अर्पित उर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३) रा. आंबाटोली, गोंदिया हा त्याचा मित्र राहुल डहाट याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना ट्रिपल सीट दुचाकीवरून आलेल्या आरोपीला मारहाण करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि किरकोळ भांडणाचे पर्यावसन अखेर तरुणाच्या खूनात झाले. तिघांनी मिळून अर्पित उर्फ बाबू ओमप्रकाश उके याच्यावर धारदार शस्त्राने वार केले ज्यात चाकूने आतडे कापल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला, रामनगर पोलिसांनी देह उचलून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा : उपराजधानीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे १७ ठिकाणी लागली आग

पीडितच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तीन फरार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बस्तोडे करीत आहेत. विशेष म्हणजे दिवाळीच्या रात्री शहरातील रस्त्यांवर खळबळ उडाली असून सर्वत्र फटाक्यांच्या आवाजात घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हैराण केले आहे. आज सोमवारी जिल्हा शासकीय केटीएस जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून, रामनगर पोलीस ठाण्याच्या वतीने फरार तीन्ही आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली आहे.

Story img Loader