गोंदिया: अर्जुनी/मोरगाव तालुक्यात गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावरील देवलगाव-बाराभाटी पोल दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका शेत मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार २० जुलै रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली. नारायण सुदाम काळसर्पे वय ४३ वर्ष रा.नवेगाव/बांध असे मृताचे नाव आहे. मृत नारायण हा नवेगाव/बांध येथील रहिवाशी असलेले मार्कंड नेवारे यांच्या शेतीच्या कामासाठी मजुरीवर गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेत मालक नेवारे यांची शेती देऊळगाव येथे रेल्वे लाईन जवळ असुन नारायण लघुशंकेसाठी रेल्वे लाईन ओलांडुन गेला. नारायण परत शेताकडे येत असतांना गोंदियाकडून बल्लारशा कडे जाणाऱ्या रेल्वेने धडक दिली. यात नारायणचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती रेल्वे व पोलीस प्रशासनाला देण्यात आली.

हेही वाचा : लक्ष मनांच्या इंद्रगुहांत भटकणारा तो चंद्र…!

माहिती मिळताच रेल्वे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नवेगाव/बांध ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेची मर्ग नोंद करण्यात आली असुन मर्ग क्रमांक १५/२०२४ कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने सदर घटनेचा तपास नवेगाव/बांध पोलीस करत आहे.

मृत नारायणच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. मृतकाच्या वारसांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी मृतकाचे कुटुंबीयांनी केली आहे.

पिंडकेपार/गोटाबोडीत मासेमारी करतांना नाल्यात पडून मृत्यू

गोंदिया: देवरी तालुक्यातील पिंडकेपार/गोटाबोडी येथे शनिवार २० जुलै रोजी दुपारी २.१५ वाजेदरम्यान दरम्यान पुर आलेल्या नाल्याच्या किनारी मासे पकडत असतांना तोल गेल्याने पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताचे नाव विजय नाईक वय ३८,पिंडकेपार असे आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून,देवरी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, तालुक्यातील अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा : सुलभ आर्थिक धोरणावरच आत्मनिर्भरता अवलंबून; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

त्याचप्रमाणे, पहिल्या पावसाच्या पाण्यातून मासोळ्या बाहेर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने मासे पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता पुरामध्ये लोक मासेमारी करतात. विजय नाईक हा सुध्दा गावालगत असलेल्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेला असता, पुराच्या पाण्यात तोल गेल्यामुळे बुडून मरण पावला. देवरी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन नाल्यातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविले. पुढील तपास पोलीस हवालदार बोपचे करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondiya farm worker dies in railway accident sar 75 css