अकोला : जुने शहरातील हरिहर पेठ भागात जातीय वाद होऊन तणावाचे वातावरण असल्यावर चक्क पोलीस ठाण्यावरच विनापरवानगी मोर्चा काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल तीन आरोपींना अटक केली. अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने शहराच्या हरिहर पेठ भागात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला. या वादानंतर एका विशिष्ट समुदायाचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. जुने शहर पोलीस व दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या भागात सोमवारी ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्यावरून मोठ्या वादात पर्यवसान झाले होते. या वादावरून गाडगे नगर व हमजा प्लॉट येथील दोन वेगवेगळ्या समाजातील मोठे गट आमने-सामने आले. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक आणि संतप्त जमावाकडून एक ऑटो रिक्षा व दोन दुचाकीची जाळपोळ करण्यात आली होती. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा