हिंदू धर्मात स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा देण्याची वृत्ती आहे असं वक्तव्य श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी नागपूरमध्ये केलं आहे. हिंदुस्थानावर शेकडो आक्रमणं झाली कारण हिंदूंचा स्वभावगुण त्यासाठी कारण आहे असंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. हिंदू समाज आत्मविश्वास शून्य आहे हे सांगायलाही भिडे गुरुजी विसरले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुस्थानाला ९६ हजार वर्षांचा इतिहास

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड, गीता मंदिर याठिकाणी मार्गदर्शक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदुस्थानाला ९६ हजार वर्षांचा इतिहास आहे. मूळ हिंदुस्थान हा हिमालयापासून हिंदी महासागराच्या मध्यापर्यंत आहे. जपान, ब्रह्मदेश, श्रीलंका, अंदमान-निकोबार, अफगाणिस्तान, इराण, इराक, इजिप्त हे देश नंतर झाले हा संपूर्ण प्रदेश हिंदुस्थान म्हणूनच ओळखला जात होता. हिंदुस्थान संपूर्ण जगाला कुटुंबाप्रमाणे मानत होता आणि आईप्रमाणे जगाची काळजी घेत होता. परंतू कृतघ्न मुलांप्रमाणे हिंदुस्थानावर इतर राष्ट्रांनी आक्रमण केलं. हिंदुस्थानाची आत्तापर्यंत २८ वेळा शकले पडली.

७६ राष्ट्रांनी हिंदुस्थानावर केली आक्रमणं

हिंदुस्थानावर जितकी परकीय आक्रमणे झाली, तितकी आक्रमणे कोणत्याही देशावर झाली नाहीत. जगातील १८७ राष्ट्रांपैकी ७६ राष्ट्रांनी हिंदुस्थानावर आक्रमणे केली. जगातील ५२ मुस्लीम राष्ट्रांपैकी ३९ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणे केली. आपण शेकडो वर्षे गुलामीत होतो. याचे कारण, हिंदूंचा स्वभावगुण आहे. हिंदू म्हणजे आत्मविश्वास नसलेला माणूस. हिंदू माणसाचा आत्मविश्वास शून्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूमधील आत्मविश्वास जागृत करण्याचे काम केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याला पुढे नेण्याचे काम अल्प आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांनी केले असंही संभाजी भिडेंनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In hinduism the tendency to betray even a brother said sambhaji bhide in nagpur rbt 74 scj
Show comments