नागपूर: संविधानात ‘इंडिया’ म्हणजे ‘भारत’ असे स्पष्ट नमूद असताना आता देशाचे नाव ‘भारत’ केले जाणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र अशा प्रकारचा नामबदल भारताला नवा नाही. यापूर्वीही देशात काही राज्य आणि काही राजधानी असलेल्या शहरांची नावे बदलण्यात आली आहे. याला आपले महाराष्ट्र राज्य अपवाद नाही.
भारत हा अनेक राज्यांचा संघ आहे. काही राज्ये जुनीच होती. काही नव्याने निर्माण झाली. ओडिशा हे तसे जुने राज्य. पण २०११ मध्ये त्याचे नाव बदलवून ते ओडिशा करण्यात आले. अशाच प्रकारे नमबदल करणारे आणखी एक छोटे राज्य आहे. त्याचे नाव पॉंडेचेरी. २००६ मध्ये या नावात बदल करून ते पुडुचेरी असे करण्यात आले.
हेही वाचा – नव्या शैक्षणिक धोरणाची सुकाणू समिती, विदर्भातून ‘हे’ एकमेव सदस्य
राज्यांप्रमाणे देशातील अनेक प्रमुख शहरांची इंग्रजकालीन नावे स्वातंत्र्यानंतर बदलण्यात आली. १९९६ ला महाराष्ट्रात बॉम्बेचे मुंबई करण्यात आले. याच वर्षी तमिळनाडूची राजधानी मद्रासचे नाव बदलवून चेन्नई करण्यात आले. पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता या शहराचे नाव २००१ मध्ये बदलून कोलकता करण्यात आले. अशाच प्रकारचा नामबदल कर्नाटकची राजधानी बॅंगलोरचा करण्यात आला व या शहराला बंगळुरू असे नवीन नाव मिळाले.
हेही वाचा – चंद्रपूर: इरई, झरपट नदीच्या सौंदर्यीकरणासाठी हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश…
उत्तरप्रदेशमध्ये इलाहाबादचे प्रयाग राज, महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबादचे छ. संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात आले. त्यामुळे नामबदल भारताला नवा नाही.