नागपूर: कळमेश्वर तालुक्यात मेंढ्या चरण्यावरून झालेल्या एका जुन्या वादावरून एकाची हत्या करणात आली होती. याप्रकरणी आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस.पावस्कर यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
आरोपी निलेश बडवाईक याने २०१८ साली मोहपा गावात रामलाल उईके याची हत्या केली होती. मृत रामलाल उईके आरोपीच्या वडीलांच्या शेतात मेंढ्या चरण्याचे काम करत होता. मेंढ्या चारण्यावरून आरोपी निलेश आणि रामलाल यांच्यात २०१७ मध्ये वाद झाला. त्यावेळी रामलाल याने निलेशला मारून जखमी केले होते. याप्रकरणाची तक्रार केळवद पोलीस ठाण्यात करण्यात आली. भांडणानंतर रामलाल गावातून निघून गेला.
हेही वाचा… नागपुरातील प्रदुषणात ऑक्टोबर महिन्यात वाढ; ३१ दिवसांपैकी २१ दिवस प्रदूषण
मात्र २०१८ साली मोहपा गावातील पुंडलिक लामसे यांच्या शेतात काम करण्यासाठी पुन्हा आला. काम करताना निलेश बडवाईक शिविगाळ करतो, अशी तक्रारही रामलालने दाखल केली होती. जुन्या भांडणावरून वाद असल्याने संधी मिळताच निलेशने रामलालच्या डोक्यावर वार केला आणि त्यात रामलालचा मृत्यू झाला. सत्र न्यायालयात याप्रकरणी १९ ऑक्टोबरला सुनावणी पूर्ण झाली. मंगळवारी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासह आरोपीवर दहा हजार रुपयांचा दंडही थोटावण्यात आला.