नागपूर: काटोल शेतकरी खरेदी विक्री संस्थेची निवडणूक २६ तारखेला पार पडली. अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडवीत माजी मंत्री अनिल देशमुख व राहुल देशमुख समर्थीत महाविकास आघाडीच्या पॅनलने बाजी मारली.
काटोल शेतकरी खरेदी-विक्री संस्थेत विविध गटातील एकूण ११ पैकी ९ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. पुन्हा एकदा या संस्थेवर महाविकास आघाडी गटाने आपला झेंडा झाला आणि वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीला शनिवार सकाळी आठ वाजता पासून शाळाक्रमांक ५ येथे मतदानाला सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या नेत्यांनी सदर निवडणुकीला सकाळ पासूनच हजेरी लावली. राजकीय नेत्यांनी कडक्याच्या उन्हात आपापल्या बूथ वर तळ ठोकून मोर्चबांधणी केली. निवडणूक सलग्न सेवा सहकारी संस्था, वैयक्तिक सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती / जमाती गट, महिला राखीव गट, इतर मगास वर्गीय (राखीव), भटक्या विमुक्त जाती / जमाती या गटातील झाली एकूण ११जागेकरिता २३ उमदेवार रिंगणात होते.

सर्वसाधारण गटात २७१सभासदांनी मतदान केले.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली गलगटे यांनी सायंकाळी उशीरा निकाल जाहिर केला. यात महाविकास आघाडी गटाच्या पॅनल मधील अजय लाडसे १८७ मते, अनुप राऊत २१२ मते, महेश चांडक १९४ मते,मनोज वंजारी १८२ मते, पुरुषोत्तम सोनटक्के १९३ मते,सविता महाजन १९० मते,सुनंदा झळके १९५ मते, दिनेश महाजन १८४ मते घेत विजयी झाले, सेवासहकारी ३८ सभासदांनी मतदान केले. त्यापैकी एक मत हे बाद झाले यात महाविकास आघाडी गटाचे दिलीप चोरघडे २२ मते घेत विजय झाले तर चरणसिंग ठाकुर गटाच्या शेतकरी पॅनल चे प्रकाश नागमोते २२, विनायक मानकर २० मते घेत विजय झाले मात्र त्यांना केवळ दोन जागेपलीकडे मजल मारता आली नाही.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला भाजपने खंडार पाडत १६ सरपंच, ६ नगरसेवकांना पक्षात सामील करून घेतले. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.