नागपूर : सध्या विधानसभा निवडणुकीची धामधून सुरु असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र, शहरातील गुन्हेगार, अंमली पदार्थ तस्कर आणि पिस्तूलांचा वापर करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. या गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून पिस्तूल जप्त करण्यात येत असून तस्करांकडून लाखोंचे अंमली पदार्थ जप्त करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांत चार आरोपींकडून पिस्तूल आणि चार आरोपींकडून एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या घटनेत, कारमधून अंमली पदार्थाची तस्करी करताना गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १२ लाखांचे अंमली पदार्थ आणि देशी बनावटीची पिस्तूल पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई सोमवारी सकाळी सात वाजता नंदनवनमधील व्यंकटेशनगरातील एनएआयटी क्वॉर्टरजवळ केली. राजू गिरी ऊर्फ दुपेंद्र चमन गिरीगोसावी (३७, बंधूनगर, झिंगाबाई टाकळी) आणि साहिल महेश सोळंकी (२८, व्यंकटेशनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर भाविक निवृत्ती महाजन (२६, ओमनगर, सक्करदरा) हा आरोपी फरार आहे.

हेही वाचा…फडणवीसांचा ‘चौकार’ की काँग्रसचे ‘परिवर्तन पर्व’

मुंबईतून एमडी नावाचे अंमली पदार्थ आणून नागपुरात विक्री करणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे ‘ड्रग्ज फ्री सीटी’ अभियान राबवत आहेत. मात्र, काही पोलीस कर्मचाऱ्यांचे एमडी तस्करांशी संबंध असल्यामुळे अभियानाला यश मिळत नसल्याचे सत्य समोर आले आहे. अशातच मुंबईवरुन दोन एमडी तस्कर नागपुरात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. सोमवारी सकाळी सात वाजता व्यंकटेशनगरातील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच संशयित कार आली. पोलिसांनी कारला थांबवले. कारमधून आरोपी राजू गिरी आणि साहिल सोळंकी या दोघांना ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता कारमधून ५९ ग्रँम एमडी पावडर आणि देशी बनावटीची पिस्तूल आढळून आली. पोलिसांनी वाहनासह १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काही अंतरावर ड्रग्ज खरेदी करणारा आरोपी भाविक महाजन हा पोलिसांना बघून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

हेही वाचा…‘या’मतदारसंघात विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण, फडणवीस म्हणतात,‘रेती चोरी व अवैध व्यवसायातून…’

पिस्तूल आणि काडतुसासह गुंडाला अटक

शहरात पिस्तूल आणि काडतुसासह फिरणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन काडतूस, पिस्तूल तसेच दुचाकी असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तहसील पोलिसांनी ही कारवाई केली. शुभम सुनील महल्ले (३०, रा. म्हाडा क्वॉर्टर) असे या आरोपीचे नाव आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि एमडी ड्रग असा एकूण १० लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहसीन शाह यासीन शाह (३४, रा. खान कॉलोनी, छिंदवाडा, मध्यप्रदेश) आणि ऋषी चैनसुख राठोड (२८, रा. जुनारपूर, छिंदवाडा, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका युवकाला अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आली. ही कारवाई कुवारा भीमसेन मंदिर चौक, खलासी लाईन मोहन नगर नाल्याजवळ करण्यात आली. मिलन यशवंत सूर्यवंशी (राजपूत ) वय २५, रा. मोहननगर असे आरोपीचे नाव आहे. डॉमिनिक सॅमसंग अलेक्झेंडर (२५ मकरधोकडा, गिट्टीखदान) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. गुन्हा दाखल होताच डॉमिनिक हा फरार झाला.