नागपूर : मकरसंक्रांतीचा मुहूर्त जानेवारी महिन्यात असला तरी आकाशात मात्र डिसेंबरपासूनच पतंग दिसतात. अलीकडच्या दशकात नायलॉन मांजाचा वापर वाढल्यामुळे पक्ष्यांच्या जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन वर्षांत नागपूर शहरात ३५२ पक्षी या मांजामुळे जखमी झाले असून त्यातील ३३ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साध्या मांजाऐवजी नायलॉन मांजा वापरण्यात येत असल्याने दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होतात, तर काहींचा मृत्यूदेखील होतो. इतरांची पतंग कापून आपली पतंग आकाशात उंच उडवण्यासाठी हा मांजा वापरला जातो. झाडांवर, इमारतींवर अडकलेला मांजा पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरतो. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा वनविभागाच्या सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात जखमी पक्ष्यांवर उपचारासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कोणताही पक्षी किंवा वन्यप्राणी संकटात सापडल्यास किंवा मांजा, तारेत अडकल्यास या केंद्रात दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५१५३०६ या क्रमांकावर सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन करतानाच यामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांची माहिती देण्यासाठी, ते पक्षी उपचाराकरिता केंद्रात आणून देण्यासाठी स्वयंसेवकांची गरज भासणार आहे.

हेही वाचा – उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढणार; ‘या’ रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द

स्नायू आणि नसांना बांधा

नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा मांजा प्राणघातक आहे, कारण तो पक्ष्यांचे स्नायू आणि नसांना कापतो. त्यामुळे त्याचे पंख कापले जातात आणि हाड मोडतात. आमची चमू जखमी पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. – पशुवैद्यक, ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र.

दरवर्षी वाढतेय संख्या

शहरात २०२२ साली एकूण २३० पक्षी जखमी झाले. त्यातील १८३ पक्षी मांजामुळे जखमी झाले व १८ पक्ष्यांचा मृत्यू झाला. जानेवारीत ६५, फेब्रुवारीत ४८, मार्चमध्ये ७० पक्षी जखमी झाले. २०२३ मध्ये एकूण २१० पक्षी जखमी झाले. त्यातील १६९ पक्षी मांजामुळे जखमी झाले व १५ पक्ष्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – नभांगणी पाच ग्रहांचे विलोभनीय दर्शन, वाचा कधी आणि कुठून दिसणार?

नायलॉन मांजापासून पक्ष्यांना वाचवण्यासाठी पुढे या

जखमी पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी नाव, क्षेत्र आणि भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करा व अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२७३७८०६, ९८६००६२९९४, ९४२२८०३५१७ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.