नागपूर: डासांमार्फत पसरणाऱ्या झिका या विषाणुजन्य आजाराची सध्या सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. यंदा या आजाराचे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून या आजार नियंत्रणासाठी आवश्यक उपाच केल्याचा दावा केला जात आहे.

महाराष्ट्रात डासांमार्फत पसरणारा झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये आढळला. तेव्हापासून ३ जुलै २०२३ पर्यंत राज्यात झिकाचे एकूण २९ रुग्णांची नोंद आहे. तर जानेवारी २०२४ ते आजपर्यंत यंदाच्या वर्षी राज्यात झिकाच्या ८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी मे- २०२४ मध्ये कोल्हापूरमध्ये एक रुग्ण, मे- २०२४ मध्ये अहमदनगरला १ रुग्ण, जून आणि जुलैला पूणेतील दोन गावांमध्ये ६ रुग्ण आढळले. त्यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात ८ झिकाच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. हे रुग्ण आढळल्यावर आरोग्य विभागाकडूनही सर्वत्र झिकाबाबत जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी किटकनाशक फवारणी, रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण, संशयितांच्या नमुने तपासणी व उपचाराची यंत्रणा विकसीत केली गेल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
Local Body Elections Maharashtra, Devendra Fadnavis Statement,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी? मुख्यमंत्री म्हणाले…
rte admissions process
आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय
chota dadiyal tiger latest news in marathi
Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?
Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…
ek thali ek thaili rss
महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम

हेही वाचा : यवतमाळ: ‘त्या’ अपघातातील माय – लेकाचा मृतदेह पाठवला कॅनडामध्ये, अस्थी विसर्जनासाठी आले होते भारतात

लक्षणे..

बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात, त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे,सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. या रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नसून रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही नगण्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे.

रुग्णांमध्ये संभावित गुंतागुंत

गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे शिशु मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते, ज्यास जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. या विषाणूचा संसर्ग गर्भावस्थाचा मुदतीपूर्वी जन्म आणि गर्भपात यासह इतर गुंतागुंतंशी संबंधित आहे. प्रौढ आणि मुलांमध्ये झीका विषाणूच्या संसर्गाशी संबंधित न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होण्याची जोखीम आहे. ज्यात मायक्रोसिफॅली (डोक्याचा घेर कमी असणे) गिलाइनबॅरी सिंड्रोमए न्यूरोपैथी आणि मायलायटिसचा समावेश आहे.

हेही वाचा : हिट अँड रन प्रकरण: आरोपी रितू मालूला अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जामीन, पोलीस कुठे कमी पडले?

रोगाचा प्रसार कसा होतो?

झिकाचा विषाणू हा प्रामुख्याने एडीस या डासांच्या चाव्याव्दारे होतो. हा डास दिवसा चावतो. या आजाराचा प्रसार लैंगिक संपर्काद्वारे, गर्भधारणेदरम्यान आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो, रक्त आणि रक्त उत्पादनांचे रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारोपणाद्वारे होतो.

आजाराचे निदान व उपचार

राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा, नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर येथे झिका या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे.

हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीं’ची माहितीअभावी धडपड सुरूच; वाशीम जिल्ह्यात उत्पन्न दाखल्यासाठी महिलांची पुन्हा गर्दी

झिकाचा पहिला रुग्ण कुठे आढळला?

झिका विषाणु हा फलॅव्हीव्हायरस प्रजातीचा असुन तो एडिस डासांमार्फत पसरतो. राज्यात झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ दरम्यान आढळला. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पूणेच्या पथकाद्वारे पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व परिंचे येथे पथकाने भेट दिली असता एका ५२ वर्षीय महिलेत हा आजार आढळला होता.

आवश्यक…

  • रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
  • निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
  • तापाकरीता डॉक्टरांच्या सल्याने पॅरासिटामॉल औषध वापरावे.
  • ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करु नये.

Story img Loader