नागपूर : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलैदरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत यंदा (वर्ष २०२४) राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी ते २१ जुलै २०२४ दरम्यानच्या काळात डेंग्यूचे ४ हजार ९६५ रुग्ण तर चिकनगुनियाचे १ हजार ७५ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे गेल्या दोन ते अडीच महिन्यात नोंदवले गेले. या काळात राज्यात डेंग्यूचे ३ मृत्यू झाले. चिकनगुनियाचा एकही मृत्यू नाही. २०२३ मध्ये सारख्याच कालावधीत राज्यात डेंग्यूचे ३ हजार १६४ तर चिकनगुनियाचे ३६३ रुग्ण होते. राज्यात २०२३ मध्ये उपचारादरम्यान डेंग्यूच्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला. चिकनगुनियाने एकही मृत्यू नाही. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मागील वर्षीहून यंदा ५७ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी मृत्यू मात्र कमी झालेले दिसत आहेत. परंतु, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत मात्र तिप्पट वाढ आहे.

icici prudential value discovery fund
आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची द्विदशकपूर्ती; गुंतवणुकीवर ‘निफ्टी’च्या तुलनेत दुप्पट लाभ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
5 Zika virus patients died in Pune Print news
धोका वाढला! पुण्यात झिकाच्या ५ रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या शंभरवर पोहोचली
What is the humanitarian crisis in Sudan
सुदानमधील लष्करी गटांतील संघर्षामुळे भीषण मानवतावादी संकट… पुढे काय होणार? भारताच्या हितसंबंधांना धोका?
Why elephant census is as important as tiger census
भारतात जवळपास ३० हजार हत्ती… व्याघ्रगणनेइतकीच हत्ती गणना का आवश्यक?
Hit and run in Gondia thrilling incident caught on CCTV
Video : गोंदियात ‘हिट अँड रन’, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
number of billionaires in India is growing
देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, भारतीय आता होत आहेत अधिक श्रीमंत; हे कसं घडतंय? जाणून घ्या
Hurun Rich List 2024
India’s Top 10 Billionaire : अंबानींपेक्षा अदाणी श्रीमंत, भारतातील अब्जाधिशांची यादी जाहीर; कोण कितव्या स्थानावर?

हेही वाचा : वर्धा : जे आजपर्यंत घडले नाही, ते आता घडणार; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रथमच…

‘झिका’च्या रुग्णसंख्येतही वाढ

राज्यात १ जानेवारी ते २१ जुलै २०२३ दरम्यानच्या काळात झिकाचा १ रुग्ण आढळला होता. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात १८ रुग्ण नोंदवले गेले होते. परंतु, १ जानेवारी ते २१ जुलै २०२४ दरम्यानच्या राज्यात झिकाचे ३९ रुग्ण आढळले.

आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या घर परिसरात जलद ताप सर्वेक्षण, रुग्णांवर उपचार, जनजागृती, डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन अळीनाशक, गप्पी मासे सोडले जात आहेत. रुग्ण व्यवस्थापनासाठी १ हजार १८० गावांमध्ये फवारणी केली आहे.

डॉ. कैलाश बाविस्कर, उपसंचालक, माहिती जनसंपर्क, आरोग्य विभाग, पुणे.

हेही वाचा : नागपूर: भीसी, लकी ड्रॉच्या नावावर गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना; अंगणवाडी सेविका, आशासेविकांच्या माध्यमातून…

चिकणगुणिया म्हणजे काय?

चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले.

चिकणगुनियचे लक्षण काय?

ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत. या आजारात सहसा मृत्यू होत नाही.

चिकनगुनियाचे निदान कसे होणार?

चिकनगुनिया साठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात. इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.

हेही वाचा : तुमचा दूधवाला दुधात भेसळ करतो का? मग त्याला सांगा आता ‘एमपीडीए’…

उपचार काय?

चिकनगुनियाचा उपचार इतर व्हायरल तापांप्रमाणेच चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. ह्या व्हायरसच्या विरोधात कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हा लक्षणं कमी करण्यासाठी दिला जातो. आराम करावा. दुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामॉल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घावी. भरपूर पाणी व पेये घ्यावीत. ताप गेल्यावरही दुखणे सुरू राहिल्यास डॉक्टरांना भेटावे. ही सांधेदुखी जवळपास सगळया पेशंट मध्ये ठीक होते. जर रक्तदाब, डायबेटिस , किडनीचे आजार किंवा हृदयविकार ह्यासारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते. डास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणं हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे व स्वच्छता ठेवणे तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करून गावातील डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे. डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम इत्यादींचा वापर करू शकतो.