नागपूर : राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांची संख्या जानेवारी ते एप्रिल २०२३ च्या तुलेनत दुप्पट आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ मध्ये राज्यातील सर्व महापालिका क्षेत्र वगळून डेंग्यूचे ४१६ रुग्ण आढळले होते. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यंदा १ जानेवारी ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान राज्यात डेंग्यूचे दुप्पट म्हणजे ८३२ रुग्ण आढळले. परंतु, एकही मृत्यू नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ या दरम्यान डेंग्यूचे ३९८ रुग्ण आढळले होते. तर १ जानेवारी ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान डेंग्यूचे ६०३ रुग्ण आढळले. त्यामुळे २०२३ मध्ये राज्यात महापालिका क्षेत्र आणि गैरमहापालिका क्षेत्र मिळून एकूण ८१४ रुग्ण आढळले होते. २०२४ मध्ये याच काळात राज्यात तब्बल १ हजार ४३५ रुग्ण नोंदवले गेल्याचेही आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.

हेही वाचा : …तर पदमुक्तीची टांगती तलवार! काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवड यांना कारणे दाखवा नोटीस

महापालिका क्षेत्रातील डेंग्यूची स्थिती

(जानेवारी ते एप्रिल)

महापालिका-२०२३-२०२४

मुंबई- १११-२६९

नाशिक- ८१- ६३
ठाणे- ०८ -२०

कल्याण डोंबीवली -०५- १३
पुणे -२१- १०

नागपूर -१५ -०८
नवी मुंबई- ००- ०४

औरंगाबाद -१० -१३

हेही वाचा : अबुझमाड जंगलात चकमक, १० नक्षलवादी ठार, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई

अवकाळी पावसाचा परिणाम

राज्यात अवकाळी पावसामुळे डास वाढून डेंग्यूचे रुग्णही वाढले. परंतु, कीटकनाशक फवारणीसह इतर प्रभावी उपायांमुळे कुठेही मृत्यूची नोंद नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले, असा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra dengue patients doubled in 2024 compared to last year as 832 dengue cases till 14 april 2024 mnb 82 css
Show comments