नागपूर : राज्यातील बहुतांश भागात काल रविवारी ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झालेली दिसून आली. एकूणच काल पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, पाऊस आला नाही. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच राज्यातील अनेक भागात उन्ह चांगलेच तापले. तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले. एरवी होळीनंतर राज्यात उन्ह तापायला सुरुवात होते आणि तापमान चाळीशी पार जाते. यावेळी महिनाभर आधीच तापमान वाढायला लागले. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर टाकली. आता पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या २४ तासात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासासाठी हा इशारा दिला आहे. राज्यात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. हवामानाच्या स्थितीत सातत्याने बदल होत आहे. तापमानात बऱ्याच ठिकाणी घट दिसून येत असली तरीही उकाड्यात मात्र वाढ झाली आहे.

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी क्षेत्रात याचा परिणाम दिसणार असून, त्यानंतर उष्ण, दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किनारपट्टी क्षेत्रावर पावसाचे सावट असतानाच विदर्भात सातत्याने उकाडा जाणवत आहे. चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात देखील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसकडे पोहोचले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दुपारच्या वेळी उष्मा वाढला आहे. याठिकाणी हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. उष्णतेच्या झळांमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी उष्माघातापासून बचावासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय वापरात आणण्याचा सल्ला दिला जात आहे. हवामान खात्याने अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणावर येणार असून उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असल्याचे सांगितले. फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपपर्यंत प्रत्येक राज्यात हवामानाची वेगळी स्थिती दिसून येत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार आज, रविवारपासून एक पश्चिमी झंझावात सक्रिय होत आहे. त्यामुळे पर्वतीय भागांमध्ये तूफान हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीसह बर्फवृष्टीचीसुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी तीन मार्चला हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी हिमवृष्टीची शक्यता असून, उत्तराखंडच्या काही भागात जोरदार पाऊस आणि हलक्या बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.