नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थीनिंना एसटीचे पास त्यांच्या शाळेत देण्याची योजना १८ जूनपासून सुरू केली होती. केवळ १२ दिवसांत तब्बल चार लाखावर विद्यार्थ्यांना एसटीने शाळा- महाविद्यालयात जाऊन पास वितरित केले आहेत.

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, राज्यात १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा- महाविद्यालयात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले आहेत. ही संख्या मागील वर्षाच्या जुन महिन्याच्या तुलनेत सुमारे ८३ हजार ने जास्त आहे. तसेच उत्पन्न २६ कोटीं रुपयांनी वाढले आहे. विद्यार्थ्यांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यंदापासून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्याची योजना आणली.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

हेही वाचा : यवतमाळ: धक्कादायक! गाढ झोपेत असलेल्या बाप-लेकास विषारी सापाचा दंश

दरम्यान एसटीच्या उपाध्यक्षांच्या आदेशानंतर स्थानिक एसटी प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास वितरण केले जात आहे. योजनेला केवळ १२ दिवसांमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जुलै महिन्यातही अशाच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरण करीत आहेत. १५ जून पासून नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. दरम्यान पूर्वी विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीच्या विविध आगार वा कार्यालयातील पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात होते. पण यंदापासून एसटी महामंडळाच्या अभिनव योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत.

विद्यार्थी- विद्यार्थीनींसाठी योजना…

राज्यभरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. त्यामुळे सध्या केवळ ३३ टक्के प्रवास शुल्काची रक्कम भरून विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाचा मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

हेही वाचा : खळबळजनक! संतनगरीत बालकाचे अपहरण करून हत्या; मृतदेह पोतडीत…बुलढाणा जिल्हा लागोपाठच्या घटनांनी हादरला

एसटीचा सुरक्षित प्रवास

एसटी बसमध्ये दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे एसटीला महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन मानले जाते. एसटीमध्ये कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे ३४ हजार चालक कार्यरत आहेत. एसटी महामंडळाकडून चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.