नागपूर : सॅनफ्रान्सिस्को येथील शंभर वर्षे जुने अल्काट्राझ कारागृह पाच-सहा मजली आहे. या कारागृहातून तुरुंगातून कोणीही कैदी पळून जाऊ शकलेला नाही. तिघांनी प्रयत्न केला, पण ते मरण पावले. आर्थर रोडसारख्या राज्यातील अनेक कारागृहात क्षमतेच्या अनेकपट कैदी असून काही ठिकाणी कैदी आळीपाळीने झोपतात. हे मानवाधिकाराचे हनन आहे. त्यामुळे विदेशातील बहुमजली कारागृहांच्या धर्तीवर राज्यात नवीन बहुमजली व अतिसुरक्षित कारागृहे बांधली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली. पुण्यात दुमजली कारागृह बांधण्यात येणार असून मुंबईत काही जागांची निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. देशातील बहुतांश राज्यात कारागृह हे इंग्रजकालीन१८९४ नुसार चालत आहेत. शिवाय बंदी अधिनियम १९०० नुसार सुरू आहेत. त्यामुळे आता त्यात बदल करून नव्या कायद्यानुसार चालणार असून विधानपरिषदेत एकमताने कारागृहे आणि सुधार सेवा विधेयक मंजूर करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा