गोंदिया: महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद वाढणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मान्य नसेल तर जाहिर करावं असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. यावर उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले की मी लहान माणसाबाबत काही बोलत नाही. कालच माझी उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे यावर लहान माणसांनी यासंदर्भात आपलं नाक खुपसू नये म्हणजे झालं असं म्हणत त्यांनी अंबादास दानवे यांचा नाव न घेत त्यांना टोला लगावला. लाखांदूर येथे काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात आले असता नाना पटोले माध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी महिला अत्याचाराचा निषेध करायला हाथरस आणि मणिपूरला गेले होते. कोलकत्ता कधी जाणार या प्रश्नावर आ.नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी हे देशाच्या प्रत्येक समस्येवर लक्ष देणारे असे एक नेतृत्व आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनीही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. राहुल गांधींकडून अपेक्षा होणं स्वाभाविक आहे. पण आपण १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर त्यांना मागच्या बाकावर बसवून पाहिले. जो धडधडीत अपमान या संविधानाच्या आणि लोकशाही व्यवस्थेचा नरेंद्र मोदींनी राहुल गांधीच्या माध्यमातून केला हे संपूर्ण देशानी पाहिलं आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

हेही वाचा : Sanjay Raut: “नागपूरमुळेच आम्ही कारागृहात”, भाजप नेत्यांचे नाव न घेता संजय राऊत म्हणाले…

पुढे एका प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की राज्यातील महायुती आणि केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. गरीबांच्या विरोधी आहे. लाखांदूर तालुक्यात मागील दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरे पडली आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, २५० मिलिमीटरच्या वर पाऊस या भागात पडला पण याची या सरकारने साधी दखल सुद्धा घेतली नाही. येथे ओला दुष्काळ जाहीर करून मदत न करणे ही पण गंभीर बाब आहे. येथे गरीबांना राहायला घरे नाहीत. यामुळे येथील जनतेत आक्रोश निर्माण होणं स्वाभाविक आहे. अश्या परिस्थितीमुळे लाखांदूरच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत याला विरोध करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने लाखांदूर मध्ये शनिवारी १७ किलोमीटरची पदयात्रा करण्यात आली. त्याचे निवेदन परवा मुंबईला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना भेटून त्यांच्याकडे येथील सर्व व्यथा मांडून तातडीने येथील शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. नाही केलं तर पुढील निवडणुकीत येथील जनता या शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

ते पुढे म्हणाले, राज्यातील सरकारने निराधाराचे घरकुलाचे हप्ते गेल्या सहा सहा महिन्यांपासून दिले नाही आणि तेथील पैसे हे सरकार भलत्याच योजनेत खर्च करून आपली वाही वाही करून घेत आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही एक सामान्य माणसाची नाळ जुळलेली संस्था आहे. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांना बंद करण्याचं काम या सरकारने केलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये ना महानगरपालिकेचे निवडणुका, ना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका..ना नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका या सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था बाबतीत काय मानसिकता आहे हे यामुळे स्पष्ट होत आहे. हे सरकार याबाबतीत लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे या बेशरम सरकारवर काय बोलावं हेच मला कळत नाही असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा : चिखलदरा सफर… आता साहसी खेळाच्‍या सान्निध्‍यात…

या तीन तोंडी महायुती सरकारच्या राज्यात कायदा व्यवस्थेचा काही संबंध नाही. ही सरकार मौज मस्तीमध्ये आहे. या सरकारची तीन तोंडे आहेत. ते राज्यातील तिजोरीला कशाप्रकारे लुटता येईल, जनतेच्या घामाचा पैसा कसा लुटता येईल यावर हे सरकार सध्या काम करत आहे. त्यामुळे या सरकार बद्दल फार काही चर्चा करावी असे मला वाटत नाही. जनतेच्या डोक्यात या सरकारच्या विरोधात मोठा राग खदखदत आहे. लोक आता विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत. कालच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुका लावतील असा अंदाज होता पण आता पंधरा दिवस पुन्हा निवडणूक लांबणीवर गेली आहे. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. हे सरकार जाणार हे ठरलेलं आहे. त्यामुळे आता लोकांना बदल हवा याबाबतची चर्चा सुरू झालेली असल्याचेही नाना पटोले म्हणाले.