नागपूर : ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्मदीक्षा सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दहा हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. देशाच्या विविध भागातून येणारे अनुयायी यावेळी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. यंदाही धम्मदीक्षेचा हा सोहळा तीन दिवस चालणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सरकारला बुद्धी द्यावी यासाठी बच्चू कडू अयोध्‍येत करणार प्रार्थना

दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये बहुतांश उत्तरप्रदेश, बिहार आणि कर्नाटक राज्यातील अनुयायांचा समावेश आहे. दीक्षा घेतल्यावर अनुयायांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मविज्ज, भंते महानाग, भंते धम्मप्रकाश आणि भिक्खु संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur 10 thousand people take dhamma deeksha at deekshabhoomi on first day of dhamma deeksha ceremony tpd 96 css