नागपूर: एसटी महामंडळाच्या शिवशाही बसची अमरावती रोडवरील वडधामना परिसरात रस्ता पार करणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक बसली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. रोशन बन्सोड (४२) रा. सुर्या रोड लाईन्स, वार्ड क्र. १, सुराबर्डी, वाडी, नागपूर असे अपघातात दगावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विजय निखाडे (४३) रा. बुट्टीबोरी, जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता. दरम्यान या मार्गाने जाणाऱ्या एसटीची शिवशाही बसने त्यांना जोरदार धडक दिली.

बसच्या धडकेत रोशन बऱ्याच अंतरावर जाऊन आदळला. हा प्रकार बघून परिसरात खळबळ उडाली. येथे बघ्यांची गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठल्याले अनुचित प्रकार टळला. दरम्यान जखमी रोशनला उपस्थितांनी नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) हलवले. परंतु रोशनचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले. या प्रकरणात पोलिसांनी शिवशाही बसचा चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

हेही वाचा : अवकाळी पावसाचा मुक्काम आता १५ एप्रिलपर्यंत, राज्यात आज कुठे आहे इशारा जाणून घ्या

हेही वाचा : अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?

अमरावती रोडवरील वाहतुकीला शिस्त लागणार कधी?

अमरावती मार्गावरील वाडीहून पुढे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहे. तर वाडीला लागूनच औद्योगिक परिसर असल्याने येथूनही मोठ्या संख्येने रोज मालवाहू जड वाहनांची रेलचेल असते. दुसरीकडे अमरावती मार्गावरून रोज मोठ्या संख्येने खासगी ट्रॅव्हल्स बसेस, एसटी बसेससह खासगी वाहनेही जातात. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळ असतांनाच मोठ्या संख्येने काही व्यक्ती अनियंत्रितपणे वाहने चालवतात. त्यात येथे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यापैकी गंभीर स्वरूपांच्या अपघातांची नोंद होत असली तरी किरकोळ अपघात पोलिसांना कळत नसल्याने ते नोंदवलेही जात नाही. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्त घालण्यासाठी पोलीस काय करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.