नागपूर : प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, नटी होण्याची स्वप्न, प्रियकराच्या आमिषाचा विश्वास, आई अभ्यासासाठी रागावली, मोबाईल हिसकावला, राग अनावर झाला या अतिशय क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन आणि शाळकरी मुली, तरुणी आणि महिलांनी घर सोडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गृहमंत्र्यांच्या शहरात गेल्या वर्षभरात तब्बल ५५९ मुली, महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातून अल्पवयीन मुली-तरुणी आणि विवाहित महिलासुद्धा घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या नोंदीतून समोर आले आहे. दररोज तीन ते चार मुली-महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात घेतल्या जात आहे. त्यासाठी विविध कारणे जरी असली तरी अशा घटनांमुळे नवी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलगी घर सोडून निघून गेली कि पालकांची गर्दी पोलीस ठाण्यात होते. अल्पवयी मुलगी असल्यास पोलीस अपहरणाची नोंद घेऊन तपास सुरु करतात. अल्पवयीन बेपत्ता झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करुन शोधण्यासाठी पथक नियुक्त करतात. मात्र, जेव्हा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली तरुणी बेपत्ता झाल्यास पोलीस ‘मिसींग’ची नोंद करुन तपास थंडबस्त्यात ठेवतता. त्यामुळे राज्यातील बेपत्ता झालेल्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत शहरातून ५५९ गुन्ह्यांची (बेपत्ता) नोंद करण्यात आली. बेपत्ता झालेल्या ५५९ पैकी ५१५ जणांचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुली-महिलांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. मुली आणि तरुणी बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असून समाजमाध्यमांवरुन ओळख आणि मैत्री झाल्यानंतर पळून जाणाऱ्यांचा टक्का वाढला आहे. अशा प्रकरणांमध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवरुन मैत्री झाली की प्रेमसंबंधापर्यंत प्रकरण पोहचून घरातून पलायन केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शाळकरी मुलींना प्रियकर सहज जाळ्यात ओढून लग्नाचे किंवा मोठमोठी स्वप्ने दाखवून घरातून पळून जाण्यासाठी बाध्य करतात. याशिवाय कौटुंबिक भांडणे, विविध कारणांसाठी मुलांना रागावणे, मनासारखे न घडणे तसेच काही वेगळे करण्याच्या नादात घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

cm Devendra fadnavis lakhpati didi
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; मार्चपर्यंत २५ लाख ‘लखपती दीदीं’चे उद्दिष्ट
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
unique initiative by friends from Maharashtra for orphaned girls in Kashmir
काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी महाराष्ट्रातील मैत्रिणींचा अनोखा उपक्रम
Indian Army jawan is missing while returning to duty 20 days after marriage
भारतीय सेनेचा जवान बेपत्ता; लग्नाच्या २० दिवसानंतर कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाला, पण…
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
woman from Buldhana missing after Prayagraj stampede has been found in Varanasi
कुंभमेळ्यात बेपत्ता महिला सापडली, वाराणसी रेल्वे पोलिसांची मदत; पालकमंत्र्यांनीही…
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल

हेही वाचा : नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…

हुडकेश्वरमधून सर्वाधिक बेपत्ता

हुडकेश्वर ठाण्यांतर्गत बेपत्ता होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या (२४७) आहे. एमआयडीसी- २१२, यशोधरानगर- २०९, अजनी -२१२ आणि कळमना ठाण्यांतर्गत २०७ मुली-तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसींग स्कॉड’ नावाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक असते. बेपत्ताची नोंद झाली की हे पथक सक्रिय होते. राज्यभरातून किंवा परप्रांतातूनही हे पथक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेते.

हेही वाचा : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”

हेही वाचा : बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…

गुन्हे शाखेने शोधले ४४ मुले

शहरात वर्षभरात एकूण ५५९ गुन्ह्यांची नोंद झाली असून एकूण त्यापैकी ५१५ बेपत्ता मुला-मुलींचा पोलिसांनी शोध घेतला. यात १८७ मुले आणि ३७२ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १७५ मुले, ३४० मुलींना स्थानिक पोलीठ ठाण्यातील पथकाने शोधून काढले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे (एएचटीयू) ४२ गुन्ह्यांत ४४ बालकांचा शोध घेतला गेला. यात १३ मुले, ३१ मुलींचा समावेश आहे.

Story img Loader