नागपूर : मराठा समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यात जोर चढला आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्र्वभूमीवर रविवारी नागपूरमध्ये मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा! लोकसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले पत्र
याबाबत फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर माहिती दिली. “मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज माझी नागपूर येथे भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले तसेच आरक्षणासंदर्भात आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षण या विषयावर सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे, अशी खात्री ही यावेळी उपस्थित बांधवांना दिली.”