नागपूर: पत्नीवर असलेल्या संशयातून दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून खून करणाऱ्या निर्दयी बापाला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. संतोष लक्ष्मण मेश्राम (३८ हिंगणा रोड) असे जन्मठेप ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी संतोष हा पत्नी सरीताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा व ही दोन्ही मुले त्याची अपत्ये नाही असा आड घेऊन त्याने दोन्ही निरागस मुलांचा खून केला होता. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना २०१८ ला घडली होती. घटनेच्या दिवशी सकाळी सहा वाजता आरोपीने पहिला मुलगा हर्ष व दुसरा मुलगा प्रिन्सकुमार या दोघांना चहामध्ये विष देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा… चंद्रपुरात रस्त्यांवरील खड्ड्यांना एकनाथ शिंदेंचे नाव; आम आदमी पार्टीचे लक्षवेधी आंदोलन
पण पत्नी सरीता यांच्या सर्तकेमुळे आरोपीचा प्रयत्न फसला. त्याच दिवशी सरीताने या दोन्ही मुलांना घेऊन तिच्या शेजारी राहणाऱ्या बहिणीच्या घरी सोडून त्या कामावर निघून गेल्या. त्यानंतर आरोपी हा पत्नीच्या बहिणीकडे गेला आणि दोन्ही मुलाला पायदळ घेऊन गेला. तसेच साधारण एक किलोमिटर अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेवरील विहिरीत दोन्ही मुले हर्ष व प्रिन्स यांना विहिरीत ढकलून दिले आणि पायी घराकडे येत होता. त्यावेळी पत्नी सरीता आणि भाचा मनिष यांनी पाहिले. पण आरोपीला विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पत्नी सरीता यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.