नागपूर: बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने दुसऱ्या बराकीतील एका युवा कैद्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या कैद्याने थेट न्यायाधीशांकडे तक्रार केली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपी कैद्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन ऊर्फ रोहन बहुरीदास (मधुबनी, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी सचिन याने मुंबईतील अंधेरी भागातील एका महिलेवर बलात्कार केला होता. त्या गुन्ह्यात सचिनला दहा वर्षांची शिक्षा झाली होती. त्याला सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याची केवळ २ वर्षे शिक्षा बाकी होती. त्याला कैद्यांचा वॉर्डन म्हणून कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या रुग्णालयात तक्रारदार कैदी शुभा (बदललेले नाव) हा सुद्धा दाखल होता. शुभा हा हत्याकांडाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मंगळ‌वारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी कैदी सचिनने शुभाला शारीरिक संबंधाची मागणी केली.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Akola , Bangladeshi Rohingya, Birth Certificate,
दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
Saif ali khan attack case, Accused Shariful ,
सैफवर हल्ला प्रकरण : आरोपी शरिफुलचा बांगलादेशातील चालक परवाना पोलिसांच्या हाती
Ghatkopar hoarding collapse case No bail for accused Arshad Khan
घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण : आरोपी अर्शद खानला जामीन नाहीच
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका
Saif ali khan , Saif ali khan latest news,
सैफ हल्ला प्रकरणः सैफची सदनिका, इमारतीतून आरोपीचे १९ फिंगरप्रींट सापडले
Rahul Gandhi FIR
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल; देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणल्याचा दावा!

हेही वाचा… कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून; उपराजधानीत चोवीस तासांत दोन हत्याकांड

मात्र, त्याने नकार दिला. त्यामुळे सचिनने त्याचा गळ्यावर धारदार वस्तू लावून बळजबरी लैंगिक अत्याचार केला. बुधवारी शुभाची न्यायालयात पेशी होती. त्याने न्यायाधीशांना लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत तक्रार केली. त्यामुळे धंतोलीच्या ठाणेदार प्रभावती एकुरके या मध्यवर्ती कारागृहात गेल्या. त्यांनी चौकशीअंती तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपी कैदी सचिनला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Story img Loader