नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडीके महाविद्यालयासमोर एका भरधाव स्कोडा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा जणांना धडक दिली. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संताजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी झाला. ही कार एका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असून कारचालक अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी दुपारी स्कोडा कार (एमएच २५- आर ३९३९) एक अल्पवयीन मुलगा भरधाव चालवित होता. केडीके महाविद्यालयासमोरून जात असताना त्याने तीन भाजीपाला विक्रेते आणि ३ ग्राहकांना धडक दिली. यापैकी तीन जण गंभीर जखमी झाले. त्यामध्ये भाजी खरेदी करण्यासाठी थांबलेले अग्रवाल दाम्पत्य आणि एका भाजीविक्रेत्याचा समावेश आहे. तिघांवरही संताजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही युवकांनी अल्पवयीन चालकाला कारबाहेर काढले. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा : मस्तवाल वाळू तस्करांचा तलाठी, कोतवालावर हल्ला….चित्रफितीत जे दिसतेय….

पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सक्करदऱ्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे, वाहतूक शाखेचे भारत कऱ्हाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या अगदी काही मिटर अंतरावर अपघात झाल्यानंतरही पोलिसांना पोहचायला अर्धा तास लागला. तोपर्यंत नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कारचालकाला चोपले

धडक देणारी कार भाजप पदाधिकाऱ्याची आहे. ती कारने त्याने अल्पवयीन चालकाच्या हाती दिली होती. त्याला नीट कार चालवता येत नव्हती. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी त्या अल्पवयीन चालकाला कारबाहेर काढले आणि चोपले. अपघात झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्याने लगेच पळ काढल्याची माहिती आहे.

हेही वाचा : ‘मविआ’ची  बैठक कशासाठी आहे माहीत नाही, मला निमंत्रण नाही-  वडेट्टीवारांनी….

चित्रफित प्रसारित

हा अपघात एका घरावर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. घटनेची चित्रफीत लगेच समाजमाध्यमावर प्रसारित झाली. पुण्यात झालेले ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असतानाच नागपुरातही असाच अपघात घडल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.