नागपूर : घटस्फोटीत महिलेला एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहित सुरेंद्र शाहु (वय २९, रा. श्रीहरीनगर, बेसा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३० वर्षीय महिला घटस्फोटित आहे. ती कॅटरिंगचे काम करतो. मैत्रीणीच्या माध्यमातून तिची आरोपी मोहितसोबत ओळख झाली. मोहितने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आधार कार्डवर कर्ज देऊन फसवणूक करणारी टोळी सक्रीय, कर्जाच्या नावावर हजारो जणांची फसवणूक

५ एप्रिल २०२० ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान आरोपी मोहितने तिला अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या दुकानात, हॉटेल व तिच्या मानकापूर येथील घरी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर आरोपी मोहितने टाळाटाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीत महिलेने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोहितविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur a young man rapes a divorced woman adk 83 css