नागपूर : खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या परीचारिकेने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. मात्र, प्रेमविवाह अयशस्वी ठरल्याने तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमरन लक्ष्मण महाकाळे (२२, रामटेकेनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, सीमरन महाकाळे ही बेसा येथील एका पॅथॉलॉजीमध्ये नोकरीवर होती. दरम्यान तिची अक्षय नकोसे या युवकाशी ओळख झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शविला. त्यामुळे सीमरन आणि अक्षय यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर सीमरनने नर्सिग कोर्सला प्रवेश घेतला. दरम्यान तिचे आणि पतीचे पटत नव्हते. चारित्र्याच्या संशयावरून पती मारहाण करीत असल्याची तक्रार ती आईकडे करीत होती. त्यामुळे ती माहेरी परत आली. ती प्रेमविवाह टिकू न शकल्याने नैराश्यात गेली.

हेही वाचा – एसआरएतील गाळे हस्तांतरण करा केवळ २०० रुपयांत

हेही वाचा – अकोला : टेबल टेनिस प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीशी केले अश्लील चाळे; न्यायालयाने गंभीर दखल घेत…

ती एकाकी राहायला लागली. त्यानंतर तिची एका युवकासोबत ओळख झाली. त्या युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवर वाद झाला. त्यामुळे ती निराश होती. सिमरनने शुक्रवारी सायंकाळी घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur a young woman committed suicide by hanging herself at home adk 83 ssb