नागपूर : मुस्लीम समाजाने आरक्षणासाठी बऱ्याचदा आंदोलन केले, पण न्याय मिळाला नाही. आता समाजाने पुन्हा आंदोलन केल्यास गोळ्या झाडून मारले जाईल, अशी भीती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. विधानभवनाच्या पायरीवर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्याला अबू आझमी आणि रईस शेख उपस्थित होते.

हेही वाचा : वर्धा : वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता आर्वीकर सरसावले, गुंता वाढला

Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Delhi minority areas delhi assembly election
‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
member registration campaign BJP
वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले

आझमी पुढे म्हणाले, मुस्लीम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही. आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील, कित्येकांना कारागृहात टाकतील. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली. या मुद्यावर विशेष अधिवेशन बोलविले जाईल, असेही सांगितले. मात्र, हे करीत असताना मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत कुणीही विचार करीत नाही. पुरोगामी म्हणवणारे पक्षदेखील याबाबत चकार शब्द काढीत नाहीत. आम्ही वारंवार मागणी करूनही सभागृहात या विषयावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला वेळ दिला नाही, असेही आझमी यांनी सांगितले.

Story img Loader