नागपूर: इंस्टाग्रामवरील मित्राने तरुणीला लॉजमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे काही छायाचित्र काढले. ती छायाचित्र प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन युवक वेळोवेळी शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. त्याच्या लैंगिक अत्याचाराला तरुणी कंटाळली होती. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली. सूरज गजानन वानखेडे (२६, आरोली, ता. कामठी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी मोनाली (काल्पनिक नाव) उच्चशिक्षित असून ती इंस्टाग्रावर नेहमी ‘रिल्स’ बनवित असते.

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas on Walmik Karad
Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराडवर मकोका, परळी बंदची हाक; सुरेश धस म्हणाले, “SIT ने आता…”
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Domestic Violence Against Men
Domestic Violence : “ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; वहिनीवर केले गंभीर आरोप

हेही वाचा… नागपूर ‘एम्स’मध्ये ‘स्पाइनल कॉर्ड इंज्युरी टेलि’ पुनर्वसन केंद्र

तिच्या प्रत्येक ‘रिल्स’ला आरोपी सूरज वानखेडे हा ‘लाईक’ करीत कमेंट करीत होता. त्याच्या कमेंट्सला मोनाली उत्तर देत होती. काही दिवसानंतर सूरजने मोनालीला भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. दोघेही व्हॉट्सअपवर चँटिग करायला लागले. त्यातून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. २३ एप्रिलला सूरजने तिला फिरायला जाण्यासाठी विचारणा केली. तिनेही होकार दिला. ती दुपारी एक वाजता हुडकेश्वर चौकात भेटायला आली. सूरजने तिला हॉटेलमध्ये जेवायला जायचे असल्याचे सांगून थेट लॉजवर नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच पुढच्या महिन्यात लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे मोनाली शारीरिक संबंधासाठी तयार झाली. सूरजने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे मोबाईलने काही छायाचित्र घेतले.

हेही वाचा… VIDEO : अखंड भारत कधीपर्यंत होईल? मोहन भागवतांनी मांडलं मत; म्हणाले…

तेव्हापासून सूरज वाटेल त्यावेळी तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत करीत होता. नकार दिल्यास तिचे अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत होता. त्यामुळे नाईलाजाने ती शारीरिक संबंधासाठी होकार देत होती. मात्र, सूरज हा वारंवार तिचे लैंगिक शोषण करीत होता. त्यामुळे मित्राच्या मागणीला ती कंटाळली होती. त्यामुळे तिने मैत्रिणीशी चर्चा करीत आपली व्यथा मांडली. मैत्रिणीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. मोनालीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरजला अटक केली.

Story img Loader