नागपूर : शहरातील जिल्हा रुग्णालयाचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. कधी निधीच्या अभावामुळे तर कधी प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयाचे कार्य पूर्णत्वास येऊ शकले नव्हते. जिल्हा रुग्णालयाच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, आता नागपूरकरांसाठी खुशखबर आहे. जिल्हा रुग्णालयातील सर्व रखडलेली कामे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. उच्च न्यायालयात दाखल शपथपत्रात प्रशासनाने ही माहिती दिली. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ९.७२ कोटी रुपयांचा निधी देखील दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी ही माहिती न्यायालयाला दिली. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेले जिल्हा रुग्णालय लवकरच नागपूरच्या नागरिकांसाठी खुले होणार असल्याची चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा