नागपूर: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुळकावत वंचित बहूजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले. परंतु, महाराष्ट्रातील सात लोकसभेच्या जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितने घेतला आहे. रविवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना तसे पत्र लिहले असून त्यांच्याकडून आलेल्या दोन जागांच्या प्रस्तावानुसार नागपूर आणि कोल्पापूरमध्ये वंचितचा उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. अकोला लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा मागितलेला नाही असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “महाविकास आघाडीत एकोपा नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा…”

राज्यात लोकसभेच्या मैदानामध्ये महायुती व ‘मविआ’मध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी ‘मविआ’कडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीचा प्रस्ताव फेटाळत आपल्या उमेदवारांची घोषणा केली. यासंदर्भात सांगताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तीन्ही पक्षात आताही एकोपा नाही. प्रत्येक पक्ष स्वतंत्र मतदार यादी जाहीर करत आहेत. त्यांच्यामधील काही जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे अशांसोबत आम्ही पुन्हा जाऊन बिघाड घालने योग्य नाही. परंतु, आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले. काँग्रेसने सातपैकी दोन जागांची नावे सांगितली त्यानुसार नागपूर आणि कोल्पापूरला आम्ही वंचितचा उमेदवार न देता पाठिंबा दिला. अन्य पाच जागांवर माहिती काँग्रेसकडून आल्यावर त्याही सांगण्यात येतील असेही आंबेडकर म्हणाले. मात्र काँग्रेसला अकोला लोकसभेसाठी पाठिंबा मागितलेल्या नाही असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहूतांश मतदारसंघ लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसला निवडणुकीत अंगावर घ्यावे लागेल. त्यांच्या दहा वर्षांच्या कामाच्या उणिवा जनतेला सांगाव्या लागतील. मात्र, ही ताकद ‘मविआ’च्या नेत्यांमध्ये नसून ती वंचितमध्ये आहे असेही आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा : गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

प्रस्तापीतांविरोधात विस्तापीत अशी ही निवडणूक होणार आहे. प्रस्तापित पक्ष आणि नेत्यांना वंचित उमेदवारांना समोर येऊ द्यायचे नसल्यानेही ‘मविआ’सोबत जाता आले नाही असा आरोपही आंबेडकर यांनी केला. आघाडीची बोलणी सुरू असताना २७ जागांवरील उमेदवारांची यादी दिली होती. या जागांचा आम्ही अभ्यास केला होता. आता त्याला कुणी गांभीर्याने घेतले नाही असेही आंबेडकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur adv prakash ambedkar told support given to congress on 7 seat is not for akola seat dag 87 css