नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचारी २५ ऑक्टोबरपासून स्थायी करण्याच्या मागणीसाठी संपावर आहेत. आंदोलकांनी २२ नोव्हेंबरला (काल) संविधान चौकात रक्तदान केले. तर आज (गुरूवारी) येथेच धरणे देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचारी-अधिकारी शासनाच्या विविध रुग्णालय वा प्रकल्पात सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल

बुधवारी आंदोलकांनी संविधान चौकातच रक्तदान शिबिरातून रुग्णांसाठी रक्त गोळा करण्यात मदत केली. तर दुसऱ्याच दिवशी आज (गुरूवारी) संविधान चौकातच सरकारच्या कंत्राटी आरोग्य कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध केला. तातडीने सरकारने मागणी मान्य न केल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur agitation of national health mission contract employees for permanent service mnb 82 css
Show comments