नागपूर : गणेशोत्सवानंतर सोन्याचे दर सातत्याने कमी होऊन ९ ऑक्टोबरला ५७ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्राम असे खाली गेले होते. परंतु नवरात्र सुरू होणार असतांनाच दर वाढून १४ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता ६० हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. नागपुरातील सराफा बाजारात १४ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार रुपये होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : खासदार नोकरी महोत्सवात २१९६ उमेदवारांना नियुक्ती पत्र

तर चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार १०० रुपये होते. हे दर ९ ऑक्टोबरला प्रती दहा ग्राम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ६९ हजार ७०० रुपये होते. दरम्यान आता हे आणखी वाढत राहणार असल्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur ahead of navratri festival gold price crosses 60000 mark mnb 82 css
Show comments