नागपूर : भिसी व ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली स्कीम चालवत हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

सचिन सुखदेव मेश्राम (४०, कोडा सावली, पारशिवनी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने संकल्प सेल्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून संबंधित स्कीम आणली. १६ महिने दरमहा हजार रुपये भरले, तर शेवटी २० हजार रुपये मिळतील. तसेच लकी ड्रॉमध्ये ज्या व्यक्तीचा क्रमांक लागेल त्याला २० हजार रुपयांचा महाराजा सोफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी तीन स्कीमदेखील होत्या. जर एखादा गुंतवणूकदार एजंट झाला तर त्याला आणखी कमिशन मिळेल, अशी बतावणीदेखील करण्यात आली. जास्त पैसे मिळतील या नादात शुभम उमेश वानखेडे (२८, अयप्पानगर) याने पैसे गुंतविले व तो एजंटदेखील झाला. शुभमने मेश्रामला १३ गुंतवणूकदार जमवून दिले. मात्र, मेश्रामने एकाचेही नाव ड्रॉमध्ये काढले नाही. १ फेब्रुवारी २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. १६ महिने पूर्ण झाल्यावर मेश्रामने गुंतवणूकदारांना पैसे व परतावा काहीच दिला नाही, तसेच एजंट्सला पैसेदेखील दिले नाहीत. शुभमसोबतच एजंट झालेल्या इतर गुंतवणूकदारांचे १ कोटीहून अधिक रुपये थकवले. मेश्राम पैसे परत करत नसल्याचे दिसून आल्यावर अखेर शुभमने कपिलनगर पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Nvidia founder Jensen Huang success story from waiter to one of the highest paid ceos richer than Mukesh ambani and Gautam adani
अंबानी, अदानी यांच्यापेक्षाही श्रीमंत व्यक्तीनं एकेकाळी केलं होतं वेटरचं काम; वाचा प्रसिद्ध कंपनीच्या सीईओचा प्रवास
Crime against the wife of Kishore Shinge the then Accounts Officer of Pimpri Municipal Corporation
पिंपरी महापालिकेतील तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगेसह पत्नीवर गुन्हा
Police attempt to extort Money, claiming to be a CBI officer, pune,
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत उद्योजकाकडून १२ लाख उकळण्याचा पोलिसांचा प्रयत्न; वाचा काय आहे नेमके प्रकरण?
priyanka gandhi assets
Priyanka Gandhi Vadra Net Worth : आठ लाखांची होंडा सीआरव्ही, सोनं-चांदी अन्…; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?
Ladki Bahin Yojana petitioner Anil Wadpalliwar claims that his life has been threatened
‘लाडकी बहीण योजना’ याचिकाकर्त्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले “माझ्या जीवाला…”
Buddhist Dalit communitys displeasure is a challenge to Congress in Bhandara Constituency
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!

हेही वाचा : तुमचा दूधवाला दुधात भेसळ करतो का? मग त्याला सांगा आता ‘एमपीडीए’…

पाच हजारांवर गुंतवणूकदार

प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सचिन मेश्रामविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. चौकशीदरम्यान त्याने जवळपास पाच हजार गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची बाब समोर आली. त्याने गरीब गुंतवणूकदारांकडून १५ कोटींहून अधिक रुपये जमविले. मात्र गुंतवणुकदारांना वस्तू किंवा रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. या गुन्ह्यात सचिन मेश्राम याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने २५ जुलै रोजी त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे, आशीष लक्षणे, विजय त्रिवेदी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : मामाने भाच्याला दुकान चालवायला दिले, त्याने डान्सबारवर १५ कोटी व प्रेयसीवर तब्बल दीड कोटी…

नागपूर, भंडाऱ्यातील नागरिक टार्गेट

सचिन मेश्राम याने त्याच्या स्कीममध्ये नागपूर, खापरखेडा, पारशिवनी, रामटेक तसेच भंडारा जिल्ह्यातील गरीब व निम्नमध्यवर्गीयांना टार्गेट केले होते. संकल्प सेल्स काॅर्पोरेशनच्या नावाने फर्निचर विक्री करण्याचा परवाना घेत त्याद्वारे त्याने अनधिकृतपणे लकी ड्रॉ योजना राबवली होती. विविध वस्तू देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना प्रोडक्ट बुकिंगचे कार्ड द्यायचा. त्याने आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना एजंट बनवून या योजना राबविल्या होत्या.