नागपूर : शासनाने मान्य केलेल्या विविध मागण्यांचा अध्यादेश काढला नसल्याचा संताप व्यक्त करत नागपुरातील आशा व गटप्रवर्तक आज, १२ जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. आंदोलकांकडून या दिवशी व्हेरायटी चौक ते संविधान चौक मोर्चाही काढला जाईल, अशी घोषणा आशा व सुपरवायझर (गटप्रवर्तक) कर्मचारी युनियन (सी.आय.टी.यू.) नागपूरतर्फे करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघटनेचे राजेंद्र साठे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांवर दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढत आहे. परंतु सरकार अल्प मोबदल्यात काम काढू पाहते. आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी २३ दिवस संप केला. त्यानंतर सरकारने त्यांना वाढीव मानधनासह इतरही आश्वासन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे अध्यादेशही काढला जात नाही.

हेही वाचा : पत्नीला दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत बघितले अन…

सरकार न्याय देत नसल्याने शेवटी १२ जानेवारीपासून नागपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संपावर जात आहे. या दिवशी व्हेरायटी चौकातून संविधान चौक दरम्यान मोर्चाही काढला जाईल. आता न्याय मिळेस्तोवर माघार घेणार नसल्याचेही साठे म्हणाले. तर १७ जानेवारीपासून संविधान चौकात धरणेही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर यांच्यासह मोठ्या संख्येने आशा वर्कर व गट प्रवर्तक उपस्थित राहतील.

हेही वाचा : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द होणार ? कारण काय वाचा सविस्तर

मागण्या काय?

  • आशा व गट प्रवर्तकांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.
  • गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करावा
  • आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्रीची सक्ती नको
  • आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन द्यावे
  • आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करा
  • सी. एच. ओ. नसलेल्या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच्या स्वाक्षरीने आशा वर्करला आरोग्य वर्धनीचा निधी द्या
  • आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी द्या.
  • शासकीय सुट्टी नसलेल्या दिवशी लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मागवा
  • डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रुपये रोज दिला जावा.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur asha workers on strike from today 12 th january 2024 mnb 82 css