नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही वैचारिक होती. शिक्षणाच्या माध्यमातून विचारांचा प्रसार-प्रचार व्हावा हा त्यांचा हेतू होता. या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हार, फूल नको तर वही-पेन आणावे, असे आवाहन करण्यात आले. दीक्षाभूमीवर यासाठी ‘एक वही, एक पेन’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्यावतीने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी ‘सहयोग’ चमू तैनात, हरविलेल्यांना शोधण्यासाठी पोलीसही घेतात मदत

या उपक्रमाच्या अंतर्गत दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांकडून वही-पेन दान केले जाते. दीक्षाभूमी स्तुपासमोरील मेट्रो भवनाजवळ या उपक्रमासाठी विशेष स्टॉल लावण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी वही, पेन या स्टॉलवर दान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दीक्षाभूमीवर गोळा करण्यात आलेली शैक्षणिक सामग्री गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल. हार-फुले दिले तर ते एक दोन दिवसात व्यर्थ होतात, मात्र वही-पेन माणसाच्या आयुष्यात नेहमी बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात अशी प्रतिक्रिया उपक्रमातील एका सदस्याने दिली.