नागपूर: पावसाच्या तडाख्यात नागपूर जलमय झाले आहे. पिपला फाटा परिसरात नाल्याच्या पाण्याची पातळी वाढून अनेक घर पाण्यात आहेत. वाचण्यासाठी नागरिक छतावर जीव मुठीत घेऊन असतांनाच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष ही हद्द आमची नसल्याचे सांगत मदतीला जाण्यास टाळत होते. त्यामुळे सर्वसामान्यांचा वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरीत होता.

नागपूरच्या शहरी आणि ग्रामीण भागात शुक्रवारी रात्रीपासून कमी- अधिक पाऊस पडत आहे. पावसाचा जोर शनिवारी सकाळपासून वाढला असून जिल्ह्यातील सर्वच नदी- नाल्यांमधील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. नाल्याचे पाणी काही खालगट भागातील वस्तींमध्ये शिरले असून पावसाचा जोर वाढल्यास स्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका आहे. दरम्यान नागपूर महापालिका हद्दीला लागून असलेल्या म्हाळगीनगर चौक ते इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपादरम्यान पिपळा परिसरात नाल्याच्या पाण्याची पातळी वाढली.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Nagpurs Weston Coalfields Limited provides assistance in Assam mining disaster
आसमच्या खाण दुर्घटनेत नागपूरच्या ‘वेकोलि’कडून मदत
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली

हेही वाचा : देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचार , शस्त्रक्रिया करायचीय? मग ‘येथे’ संपर्क करा…

नाल्यासह पावसाचे पाणी परिसरातील अनेक इमारती व घरातील तळमजल्यात शिरले. बघता- बघता घरातही पाण्याची पातळी वाढत असल्याने अनेक कुटुंब वाचण्यासाठी छतावर चढले आहे. येथील प्रमोद इंगळे कुटुंबही छतावर अडकले होते. त्यांच्या घरात एक अपंग मुलगा असून एक वृद्धाही आहे. या कुटुंबाने एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नागपूर महापालिकेच्या आयुक्तांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुखांना या कुटुंबाला बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानंतर महापालिकेच्या संबधित विभागाकडून इंगळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला गेला. त्यानंतर हा परिसर महापालिका हद्दीत नसल्याचे सांगत तेथे येणे शक्य नसल्याचे संबंधिक कर्मचाऱ्याने सांगितले. हे उत्तर एकूण इंगळे कुटुंबाला धक्काच बसला. परंतु थोड्याच वेळात महापालिका आयुक्त कार्यालयाकडून मात्र या कुटुंबाला वाचवण्यासाठी पथक रवाना झाल्याचे सांगण्यात आले. परंतु महापालिकेतील संबंधित कर्मचाऱ्याच्या उत्तरामुळे नागपूर महापालिका सर्वसामान्य नागरिक पुराच्या पाण्यात बुडत असल्यास हद्द बघून त्यांना वाचवणार काय? हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही मदत मागितली. परंतु या कुटुंबाला या कठीण काळात मदत मिळणार कधी? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा : Bhandara Rain News: भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी ; गोसीखुर्द धरणाची ३३ दारे उघडली…

आदर्श संस्कार विद्यालयाच्या छतावरही मुले

पिपळा परिसरातील आदर्श संस्कार शाळेच्या छतावरही मुले दिसत असल्याचे येथे अडकलेल्या प्रमोद इंगळे यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. तर परिसरातील इतरही खोलगट भागात असलेल्या घरात जास्त पाणी असून येथे पाण्याची पातळी वाढत असल्याने धोका वाढत असल्याचेही इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा : आनंदवार्ता! रेल्वेचे सामान्य श्रेणीचे डब्बे आता वाढणार; महत्त्वपूर्ण बदलामुळे प्रवाशांना दिलासा

एक हजारावर लोकसंख्या

पिपळातील इंद्रप्रस्त नगर परिसर असलेल्या या भागात बरेच अपार्टमेंट, फ्लॅट स्किम, स्वतंत्र घरांमध्ये सुमारे एक हजारावर लोकसंख्या राहते. त्यापैकी काही खोलगट भागात असलेल्या घरांमध्ये पाण्याची पातळी जास्त असून उंचावर असलेल्या घरांमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याचेही इंगळे यांनी सांगितले.

कुटुंबातील सहा जणांना वाचवण्यात यश

पीपला फाटा परिसरातील घराच्या छतावर अडकलेल्या इंगळे कुटुंबापर्यंत चार तासांनी नागपूर महापालिकेच्या एनडीआरएफची चमू पोहोचली. त्यांनी कुटुंबातील सहाही सदस्यांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी आणले. त्यापूर्वी हे कटुंब नेमके कुठे आहे हे कळत नव्हते. परंतु काही अंतरावर इंगळे यांचे नातेवाईक शैलेश राहत होते. त्यांनी शेवटी स्वतः मानेपर्यंत असलेल्या पाण्यात जाऊन इंगळे कुटुंबाचे घर दाखवले. त्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले. या कुटुंबीयांनी शेवटी डोळ्यात पाणी आणत महापालिका आयुक्तांचे आभार मानले.

Story img Loader