नागपूर : कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरण्याचा आदेश शासनाने काढला आहे. यासाठी नऊ कंपन्यांना पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. या कंपन्या सरकारमधील काही आमदारांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या असल्याचा आरोप होत असतानाच आता या आदेशाला संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. यात आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखील उडी घेत या निर्णयाच्या विरोधात व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी…

यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, सलील देशमुख, विद्यार्थी शहराध्यक्ष प्रणव म्हैसेकर, प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मुनाज शेख उपस्थित होते. विद्यमान भाजप प्रणित सरकार हे कंत्राटी सरकार असून लोकप्रतिनिधींपासून कर्मचारी ते शासकीय संस्था आणि शासकीय उपक्रम या सगळ्यांमध्ये कंत्राटी भरती सुरु आहे. मात्र राज्यातील तरुणांच्या भवितव्यासोबत या सरकारला आम्ही खेळू देणार नाही. शासकीय नोकरी हा तरुणांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करत आहे. तरीही सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला नाही, तर मुंबई येथे तीव्र आंदोलन केले जाईल, असे सलील देशमुख म्हणाले.