नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते, असे म्हणत प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांचे प्रेम मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जातात. मात्र, प्रियकराकडून हत्याकांडासारखा गंभीर गुन्हा घडल्यानंतर प्रेयसीने त्याला पळून न जाता आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच हत्याकांडाचा उलगडा झाला. वाठोड्यात हे हत्याकांड घडले होते. करण उके असे आरोपीचे नाव आहे तर त्याने मोठा भाऊ मयूर ऊर्फ रँपर संतोष उके याचा चाकूने भोसकून खून केला.

आरोपी करण उके हा बेरोजगार असून त्याचा मोठा भाऊ मयूर ऊर्फ रँपर उके हा इंस्टाग्रामवर रँप सॉंग किंवा रिल्स बनवित होता. त्याच्या वडिलाचे कोरोनामध्ये निधन झाले तर वृद्ध आई धुणी-भांडी करते. मयूरला दारुचे व्यसन होते. दारुच्या पैशासाठी मयूर सतत घरात भांडण करीत होता. तसेच घरातील भांडे-कुंडी किंवा वस्तू विकून दारु पित होता. त्यामुळे आई व भाऊ करण दोघेही त्रस्त झाले होते.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…

हे ही वाचा…अमरावती जिल्‍ह्यातील तीन मतदारसंघांमध्‍ये तीव्र स्‍पर्धा, बंडखोरी अटळ

मयूर गेल्या काही दिवसांपासून पैशासाठी आईला मारहाणसुद्धा करायला लागला. त्यामुळे करणला नेहमी वाईट वाटत होते. करण हा भावनिक असून त्याचे एका प्रिया नावाच्या तरुणीवर प्रेम आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध आहेत. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, करण हा बेरोजगार असल्यामुळे लग्नास विलंब होत होता. तसेच प्रियाने आपल्या आईवडिलांना करणशी असलेल्या प्रेमसंबंधाबाबत सांगितले होते. मात्र, तिचे कुटुंब करण बेरोजगार असल्यामुळे लग्न लावून देण्यासाठी तयार नव्हते. प्रियाने प्रेमासाठी आपल्या आईवडिलांना सोडून करणला साथ देण्याचे वचन दिले होते. यादरम्यान पाच सप्टेबरला मयूरने दारुच्या पैशासाठी आईला मारहाण केली. त्यावेळी करण घरी होता.

त्याने मयूरची समजूत घालून घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्याने करणला मारहाण करण्यास सुरुवात केली. चिडलेल्या करणने घरातील चाकू घेऊन त्याच्यावर दोनदा हल्ला केला. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही वेळातच मयूरचा मृत्यू झाला. ठाणेदार हरिष बोराडे यांना कुटुंबियांवरच संशय होता. त्यामुळे त्यांनी करणच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवले.

हे ही वाचा…नागपूर : योजनादूतांना दरमहा १० हजार, ‘ येथे ‘संपर्क साधा

मृतदेहाची लावली विल्हेवाट

करणने मयूरचा आईसमोरच खून केला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याने भावाचा मृतदेह घराच्या छतावर नेला. तेथून तो मृतदेह चिखलात फेकून दिला. घरात येऊन त्याने रक्ताने माखलेले कपडे पेटवून दिले आणि राख शौचालयात टाकली. त्याच्या आईने घरातील रक्ताचे डाग स्वच्छ केले. मुलाचा खून झाल्याबाबत अनभिज्ञता दाखवत पोलिसांची दिशाभूल केली.

हे ही वाचा…Video : लग्न मोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद; तलवारीने हल्ला अन् दगडफेक

असा झाला उलगडा

भावाचा खून केल्यानंतर रात्री दोन वाजता प्रियाला भेटायचे आहे म्हणून एक मॅसेज केला. दुसऱ्या दिवशी एका कॉफी हाऊसमध्ये दोघांची भेट झाली. तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिने त्याच्या अपकृत्याला साथ देण्याऐवजी थेट पोलिसांत जाऊन कबुली देण्याचा सल्ला दिला. प्रेयसीचा सल्ला त्याने मानला. त्याने वाठोडा पोलिसांकडे हत्याकांडाची कबुली दिली.

Story img Loader