नागपूर : सध्या नागपुरात शिंदे फडणवीस पवार सरकारचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय जनता पक्षाच्या व शिंदे गटाच्या सर्व मंत्री व आमदारांनी रेशीमबागेत स्मृती मंदिर परिसरात येऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच रेशीमबागेत सभागृहाच्या बाहेर हिरवळीवर मंत्री आणि आमदारांची व्यवस्था करण्यात आली. दरवर्षी संघाकडून विविध उपक्रमांची माहिती दिली जाते मात्र यावर्षी केवळ सर्व आमदार आणि मंत्री यांचा संघाचे सहसरकार्यवाह श्रीधर गाडगे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी परिचय करून घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : दुसरीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतरच !शिक्षणमंत्र्यांची घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

स्मृती मंदिर परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते, गणेश नाईक, राम कदम, अतुल सावे चंद्रकांत दादा पाटील, आमदार आशिष शेलार, हरिभाऊ बागडे, नितेश राणे, शिंदे गटाचे भरत शेठ गोगावले, दीपक केसरकर, मनीषा कायंदे, भाजपचे सर्वच आमदार उपस्थित होते. यावेळी सर्वांना संघाच्या विविध उपक्रमांची माहिती असणारे पुस्तक भेट देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur bjp and shivsena shinde faction mla visits reshimbag dr hedgewar vmb 67 css