नागपूर : ओबीसी आरक्षणाबाबत नाना पटोले याना बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी दररोज ओबीसी समाजाचा अपमान करत आहे त्यामुळे त्यांना पटोले यांनी समजवावे, अन्यथा जी काँग्रेस उरली आहे ती, त्यांच्या हातून जाईल. खरे तर ओबीसी समाज काँग्रेसवर नाराज असल्यामुळे प्रथम पटोले यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले आहे आता सुद्धा जे विशेष अधिवेशन होणार आहे त्यामध्ये सर्व पक्षीय आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील त्याला पाठिंबा देतील, ओबीसी मधून एक टक्का ही आरक्षण ही कमी केले जाणार नाही.. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची भूमिका आहे. मात्र, नाना पटोले ओबीसी व मराठा समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. ओबीसी समाजाचा त्यांचे नेते राहुल गांधी अपमान करत आहे त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : बुलढाणा : अवकाळी पावसाचा आंब्याच्या मोहोराला फटका; वीज पडून एकाचा मृत्यू
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने पूर्ण अभ्यास केलेला आहे. कायद्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवल्या आहेत. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे टिकणार आरक्षण असणार आहे. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने घेतलेल्या भूमिकेच सर्वांनी स्वागत करावे आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांना केली आहे. अजित पवार हे ज्यांना घड्याळ देईल, त्यांना पूर्ण ताकदीने विजयी केले जाईल. बारामतीमध्ये लोकसभेत अजित पवार यांनी दिलेला उमेदवार विजयी होईल. घमंड नाही तर जनतेवर विश्वास आहे आणि मोदी यांची विकासाची गॅरंटी आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्रामधून ७१३ प्रतिनिधी जाणार आहेत. यात अशोक चव्हाणसह अन्य दोन राज्यसभेचे उमेदवार असणार आहे. मोदी यांच्या मागे महाराष्ट्र कसा उभा राहिल त्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न केले जाणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.