नागपूर : वाघनखाबाबत करार झाला असून लवकरच लंडनमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे एक लाईट अँड साउंड शो होईल. शिवाय जगदंबा तलवारीचा पत्र व्यवहार झाला आहे. काही तांत्रिक मुद्दे असून त्याचा पाठपुरावा करतो आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘मी पुणेकर’ या संस्थेने काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार त्यांना मदत करणार आहे. भारत -पाकिस्तान सीमेवर ज्यावेळी हा पुतळा उभा राहील त्यावेळी चीन वक्र दृष्टीने पाहण्याची हिंमत करणार नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहे. काँग्रेसने जेवढे देशाचे नुकसान केले आहे तेवढे कोणीच केले नाही. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी कोणती काम केली याबद्दल सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळे ते टीकाटिप्पणी करत राहतात.

Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Mani Shankar Aiyar
Mani Shankar Aiyar On Gandhi Family : माझी राजकीय कारकीर्द घडवली ‘गांधीं’नी आणि बिघडवलीही ‘गांधीं’नीच : मणिशंकर अय्यर
What Ajit Pawar Said About CM Post ?
Ajit Pawar : “मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री…”, अजित पवारांचं ते उत्तर आणि पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ
Ministers profile
मंत्र्यांची ओळख : अँड. माणिक कोकाटे, संजय सावकारे, जयकुमार रावल, नरहरी झिरवळ
Ministers profile Pankaja Munde Pankaj Bhoyar Sanjay Rathod Akash Fundkar Ashok Uike
मंत्र्यांची ओळख : पंकजा मुंडे, पंकज भोयर, संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके
Seven historical reasons for the decline of Maharashtra
महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे
Priyanka Gandhi Reaction on Narendra Modi Speech
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप दशकांनंतर मला असं जाणवलं की…”

हेही वाचा : कोतवाल भरतीमधून स्पष्ट झाली बेरोजगारीची तीव्रता! दीडशे पदासाठी चार हजारांवर अर्ज; उच्चशिक्षितही रांगेत

शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत अवमान करतात. काँग्रेस आता पप्पूची पार्टी होत आहे, अशी टीका त्यांनी केली. कंत्राटी पद्धतीच्या आदेशासंदर्भात भ्रम निर्माण केला जात आहे. ते लोक स्वतः आदेश वाचत नाहीत. आदेश किती पानांचा हेही त्यांना माहीती नाही. मात्र अफवा पसरवण्यात विरोधकांचा हात आहे. यापासून जनतेने सावध राहिले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. आपल्या देशाची प्रगती काही लोकांना पचत नाही. त्यांना वाटतं देश असाच गरीब राहिला पाहिजे आणि फक्त त्यांच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. इंडिया फॉर इंदिरा आणि इंदिरा फॉर इंडिया या विचाराच्या बाहेर ते पडत नाहीत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

Story img Loader