नागपूर : महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत आहे .कुठलेही मतभेद नाही. महायुतीतील तिन्ही नेत्यांशी मी व्यक्तिगत बोललो आहे. कुणाचाही जास्त जागा मागण्याचा आग्रह नाही. महाविकास आघाडीमध्ये जागांबाबत जो अडेलतट्टू पणा दिसतो तो महायुतीत नाही. राज्यात महायुतीचे सरकार यावे यासाठी महायुतीमधील तीनही नेते एकत्रितपणे काम करत असल्याचे मत ,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार गटाने जास्त जागांची मागणी केली असेल तर त्यांचा तो अधिकार आहे मात्र, जी जागा जो जिंकू शकेल अशा जागांवर त्या पक्षाचे उमेदवार महायुती म्हणून लढणार आहे. महाविकास आघाडीला सत्तेशिवाय काही दिसत नाही. राज्यात गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यावर राज्य सरकार पूर्ण लक्ष ठेवून आहे. मात्र अशा घटनेचे महाविकास आघाडीचे नेते भांडवल करून लाडक्या बहिणींना मदत करणारे सरकार जावे, जनसामान्यांना न्याय देणार सरकार जावे आणि तीन पक्षाचे सत्तेसाठी उपाशी असलेले महाविकास आघाडीचे सरकार यावे त्यांना वाटत असल्यामुळे ते विविध राज्य सरकारच्या योजनावर आणि घटनावर राजकारण करत आहे अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा : ‘कॅन्सर’च्या वेदना असह्य; ‘त्यांनी’ घेतला गळफास, आईने दरवाजा…
संजय राऊत यांच्यावर टीका
सामना मधून किंवा संजय राऊत यांचा टीका करण्याचा एक मात्र धंदा आणि कार्यक्रम सुरू आहे. ते दीनदुबळ्याच्या विकासासाठी कधी भाष्य करताना दिसले नाही. कल्पोकल्पित कथा करून मतदारांची सहानुभूती मिळवत सत्तेत ल्त्यांचा असफल प्रयत्न सुरू आहे मात्र तो यशस्वी होणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
शिवरायांचा पुतळा: कारवाई होणार
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. त्यात जो दोषी असेल, मग तो साहित्य देणार असो, की पुतळा उभारणारा असो, चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र त्यावर सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी राजकारण करणे योग्य नाही. पुतळ्याबाबत निश्चितपणे पुढील काळात धोरण निश्चित केले जाईल ,असेही मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा : MPSC Result: वडिलांचे छत्र हरपले, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष; वैष्णवी झाली उपजिल्हाधिकारी
पंतप्रधान मोदींचा दौरा
पंतप्रधान यांचा दौरा काल पावसामुळे रद्द झाला, त्यावरूनही विरोधकांचा डोक्यात सत्तेचे स्वप्न पडत आहे.आघाडीचे सरकार असताना त्यांनी मेट्रोची सुरुवात कधी केली नाही मात्र आता उद्घाटन करण्याची त्यांना आता घाई झाली आहे.
हर्षवर्धन पाटील भाजपातच
हर्षवर्धन पाटलांशी स्वतः बोललो आहे. ते आता शरद पवार गटात जाणार नाही तर भाजपमध्ये राहणार असल्याचे त्यांनी मला स्पष्ट सांगितले ,असेही मुगंटीवार म्हणाले.
हेही वाचा : MPSC Results: राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल
उध्दव ठाकरे यांचा दौरा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमेश्वरमध्ये पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे येत असले तरी त्यांना मतदार मतपेटीतून उत्तर देतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.