नागपूर : धारावीच्या पुनर्विकासाचे काम उद्धव ठाकरे यांना करता आले असते पण त्यांच्या निष्क्रियतेमुळे ते झाले नाही. जनतेला मूर्ख बनवण्याकरिता मोर्चे काढायचे. या मोर्च्याने काही फरक पडणार नाही आणि जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : हनुमान चालिसाला विरोध केला, त्‍यांचे लंकादहन झाले; मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईचा विकास केला जात आहे. धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावी त्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे मात्र उद्धव ठाकरे आता धारावी मुद्दायर राजकारण करत आहे. त्यांना धारावीसाठी रस्त्यावर उतरावे लागले हे खर म्हणजे त्यांनी केलेले पाप असल्याचे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा मोर्चा हा फुसका बार आहे, मुंबईचा मूड आता महायुतीच्या बाजूने आहे त्यामुळे घाबरलेले ठाकरे आज मोर्चा काढत आहेत. हा शिल्लक राहिलेल्या पार्टीचा मोर्चा आहे. महाराष्ट्र मागे गेला त्याचे कारण म्हणजे मुंबईचा विकास झाला नाही. गरिबांना घर मिळाली नाही. स्वतः ची निश्क्रियता झाकण्यासाठी असे मोर्चे काढतात. ते पाप लपवण्यासाठी बवंडर करायचे काम उद्धव ठाकरे करत आहे.

हेही वाचा : “…तर अजित पवारांना बरोबर घेतलेच नसते”, विनोद तावडेंचं विधान

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. जनतेला कन्फ्यूज करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्याला लोक कंटाळले आहे असेही बावनकुळे म्हणाले. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे त्याचे कारण ही बैठकीत केंद्रीय नेतृत्व असतात तेव्हा आमचा नेता मोबाईलमध्ये गुंतून राहू नये हाच उद्देश आहे, म्हणून मोबाईलला बैठकीत बंदी होती, असेही त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur bjp state president chandrashekhar bavankule criticises uddhav thackeray march for dharavi vmb 67 css
Show comments