नागपूर : महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी मोदींच्या संकल्पाला साथ म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीला साथ द्यावी, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. जागा वाटपाचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र मिळून सोडवतील, असे बावनकुळे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमासोबत बोलत होते. राज ठाकरे आमचे मित्र असून त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी नाही. गुढीपाडव्याला होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे चांगला निर्णय करतील असा विश्वास आहे. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा योग्य सन्मान करणे आमचा कर्तव्य आहे, आवश्यक नाही की एखादी जागा किंवा एखादी जागा मिळालीच पाहिजे. ही विचाराची लढाई आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आमच्या सोबत येतील, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती

रामनवमीला जल्लोष

बुधवारी पंतप्रधानांची रामटेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कन्हानमध्ये मोठी सभा होणार आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात उत्साहाचे वातावरण असून पाचही जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहे. यंदाची रामनवमीही भाजप कार्यकर्तेही प्रत्येक बूथ, परिसरातील मंदिरामध्ये जल्लोषात साजरी करणार आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जगात दिवाळी साजरी होताना आपण पाहिली आणि १७ एप्रिल रोजी पुन्हा एकदा दिवाळी साजरी होईल. यंदाची रामनवमी महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

रामनवमी श्रीरामाचा सण असून कोणीही आम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून थांबवू शकत नाही. कोणीही कितीही आरोप केले तरी रामनवमी जोमात आणि उत्साहात साजरी होईल असेही बावनकुळे म्हणाले.